घरमुंबईBMC Budget 2023 : आरोग्यासाठी 1680.19 कोटींची तरतूद; केईएम, नायरसह अनेक रुग्णालयांचा होणार कायापालट

BMC Budget 2023 : आरोग्यासाठी 1680.19 कोटींची तरतूद; केईएम, नायरसह अनेक रुग्णालयांचा होणार कायापालट

Subscribe

सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा 2023 -24 या वर्षांचा अर्थसंकल्प आज 4 फेब्रुवारीला महापालिका मुख्यालयातील सभागृहात मांडण्यात आला आहे. यंदा महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला आहे. महापालिकेला यंदाचा एकूण अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटी रुपयांचा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6 हजार 670 कोटींची वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी 6309.38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12 टक्के इतका आहे. यातून मुंबईतील केईएम, नायर, भगवतीसह अनेक रुग्णालयांचा कायापालट केला जाणार आहे.

यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचा विस्तार करण्यासाठी 50 कोटी, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी 1.40 कोटी, असंसर्गजन्य आजारांसाठी 12 कोटी, शीव योगा केंद्रासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या 2022- 23 च्या सुधारित अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी 1287.41 कोटी रुपयांची तरतूद केली होती. जी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजमध्ये 1680.19 कोटी इतकी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 392.78 कोटी रुपये इतकी प्रस्तावित वाढ करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीत ऍक्वर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाच्या बांधकामासाठी 28 कोटी दिले आहेत. तसेच नायर दंत महाविद्यालयाचे विस्तारीकरणासाठी 17.50 कोटींची, कामाठीपुरा येथील सिद्धार्थ / मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकासनासाठी 12 कोटींची तरतूद केली आहे.

- Advertisement -

यात केईएम, नायर आणि सायन येथे प्रत्येकी 3-टेस्ला M.R.I सोबत प्रत्येकी 15 कोटी रुपये खर्चून प्रगत C.T.Scan मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत आगाऊ चाचण्या देण्यासाठी केईएम, नायर आणि सायन येथे प्रत्येकी 25 कोटी रुपये खर्चाची मशीन बसवल्या जातील.

मुंबईतील सार्वजिनक रुग्णालयांच्या पुनर्विकासनासाठी भरघोस निधी 

यात ओशिवरा प्रसूतीगृहाची दुरुस्ती/ पुनर्बांधकाम 9.50 कोटी, के. ई. एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नती 7 कोटी, आर. एन. कूपर रुग्णालय येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम 5 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

टाटा कंपाऊंड आणि हाजी अली वसतीगृहाच्या बांधकामासाठी 2 कोटी, के.ई.एम. रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाकरीता 1 कोटी, भगवती रुग्णालयाचा पुनर्विकासासाठी 110 कोटी, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम 110 कोटी, एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरणासाठी 95 कोट कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकामासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केली आहे.

सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकासाठी 70 कोटी, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय 60 कोटी, वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरणासाठी 5 3.60 कोटी, तर एल विभागातील संघर्ष नगर येथे, रुग्णालयाकरीता राखीव भूखंड विकासासाठी 35 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी या अर्थसंकल्पामध्ये 75 कोटी आणि सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 50 कोटी रुपये तरतूद केली आहे. तर स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी 1.40 कोटी रुपये तरतूद केले आहेत. यासह किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यासाठी 35 कोटी रुपये
आणि असंसर्गजन्य रोग कक्षासाठी 12 कोटी रुपये, तसेच शिव योग केंद्रांसाठी 5 कोटी रुपये तरतूद आहेत.


कसबा, चिंचवड जागा सुद्धा मविआ एकत्रित लढणार; आमचा राजकीय शत्रू एकचं; संजय राऊतांचं विधान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -