घरमुंबईLocal TimeTable Update: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा ऑन ट्रॅक येणार

Local TimeTable Update: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा ऑन ट्रॅक येणार

Subscribe

येत्या १५ दिवसांमध्ये मुंबई लोकलच्या वेळा सर्वसामान्यांसाठी बदलण्याचे संकेत

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली नाही तर येत्या १५ दिवसांत मुंबई लोकलच्या वेळा सर्वसामान्यांसाठी बदलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मुंबई लोकलमधून प्रवास करताना ठराविक वेळेचं बंधन नसेल. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुरेश काकाणी यांनी असे सांगितले की, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलच्या वेळा बदलण्याबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, काही ठराविक वेळेत सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे सामान्यांसाठी लोकल सुरू होऊन आठवडा झाला असला तरी कोरोनाबाधितांमध्ये वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली नसल्याने येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाच्या वेळा बदलणार येणार असल्याचेही सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. (Major update on mumbai suburban local train for ordinary commuters)

लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या संदर्भात सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, त्यामुळे टप्प्या-टप्प्याने लोकल सेवा सुरू करणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. यासह गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ठराविक वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मूभा दिली होती. मात्र सध्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येत्या काही दिवसांत मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा कोणत्याही वेळेचं बंधन न ठेवता सर्वांसाठी पुन्हा खुली करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या सर्वसामान्य प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे तर याच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेचा प्रवास करता येणार नाही. तर या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी म्हणजेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकणार आहेत.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -