घरCORONA UPDATECorona Vaccination : लसींच्या पुरवठ्यासाठी पालिका उत्पादक कंपन्यांकडे करतेय पाठपुरावा

Corona Vaccination : लसींच्या पुरवठ्यासाठी पालिका उत्पादक कंपन्यांकडे करतेय पाठपुरावा

Subscribe

५०० लसीकरण केंद्रांची व्यवस्था

मुंबईकरांसाठी १.८० कोटी लसींची मात्रा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिका लस उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा करीत आहे. तसेच, केंद्र सरकराने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे सध्या सरकारी, पालिका आणि खासगी अशी ३०० लसीकरण केंद्रे उलब्ध आहेत. त्यात आणखीन २०० ने वाढ करून एकूण ५०० लसीकरण केंद्र सुसज्ज ठेवण्याची पालिकेची तयारी आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेने १६ जानेवारीपासून मुंबईतील नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्रे सुरू केली. सध्या सरकारी, पालिका आणि खासगी अशा ३०० लसीकरण केंद्रांच्या मार्फत मुंबईकरांना लसींची मात्रा देण्यात येत आहे.
पालिकेने मुंबईकरांसाठी आवश्यक १.८० कोटी लसींची मात्रा उपलब्ध करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले होते. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही ज्यांनी टेंडर भरले त्यांनी लसीचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक लस उत्पादक कंपन्यांशी कोणताही करार केलेला नसल्याचे आणि त्याबाबतची कागदपत्रे पालिकेने दिलेल्या वेळेत सादर न केल्याने ते सर्व पुरवठादार हे अपात्र ठरले. अखेर पालिकेने ग्लोबल टेंडरच रद्द केले. मात्र पालिकेला शोध घेऊनही लसीचा पुरवठा करणारे नवीन पुरवठादार सापडलेले नाहीत. मात्र पालिकेने लसीचा पुरवठा होण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू ठेवत पाठपुरावाही सुरू ठेवला आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली.

- Advertisement -

५०० लसीकरण केंद्रांची व्यवस्था

केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी महापालिकेकडून ५०० लसीकरण केंद्र सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये सध्या लसीकरण करण्यासाठी पालिका, सारकारी आणि खासगी ३०० लसीकरण केंद्र सुरु आहेत. आणखी २०० लसीकरण केंद्र वाढवून ५०० लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.


रणवीर सिंह, विक्की कौशल की रणबीर कपूर? ‘लगान’च्या रिमेकसाठी अमिरची कोणाला सर्वाधिक पसंती

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -