घरक्रीडाडॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक बापू खरमाळे यांचे निधन

डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक बापू खरमाळे यांचे निधन

Subscribe

महाराष्ट्र शासनानेही बापूंना सन २००१-०२ साली ‘दादोजी कोंडदेव’ हा प्रशिक्षकांसाठीचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाचे दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त संस्थापक बापू खरमाळे यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. क्रीडा शिक्षक म्हणून डॉ. शिरोडकर हायस्कुल येथे नोकरीवर रुजू झाल्यावर बापू यांनी कबड्डी, खो-खो आणि लंगडी या खेळावर लक्ष केंद्रित केले. मात्र, परळ भागात कबड्डीचा जास्त जोर असल्याने त्यांचा या खेळाकडे अधिक ओढा होता. त्यातूनच मग डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाची त्यांनी स्थापना केली.

भारती विधाते-भुजबळ, मनीषा गावंड-कदम, स्नेहल साळुंखे-कुदळे व मेघाली कोरगावकर-म्हसकर या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू त्यांच्याकडे घडल्या. त्याशिवाय नयना पालांडे, सुजाता साळुंखे-काळगावकर, संगीता घाडीगावकर, सुनीता जाधव, लता केर, तृप्ती कोचरेकर-शिवतरकर, श्रद्धा काळे ते आताची क्षितिजा हिरवे या खेळाडू तिथेच उदयास आल्या.

- Advertisement -

शांत व संयमी असलेले बापू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा अभ्यास करण्यात माहीर होते. या त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी नवयुग क्रीडा मंडळ व विश्वशांती या त्या काळातील दादा संघांना आव्हान उभे केले होते. त्यांच्या या वृत्तीची दखल घेत कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांनी त्यांची महाराष्ट्र महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अनेकदा नेमणूक केली. महाराष्ट्र शासनानेही बापूंच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन २००१-०२ साली ‘दादोजी कोंडदेव’ हा प्रशिक्षकांसाठीचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -