रणवीर सिंह, विक्की कौशल की रणबीर ? ‘लगान’ रिमेकसाठी अमिरची कोणाला पसंती

bollywood vicky kaushal ranveer singh or ranbir kapoor aamir khan reveals who is perfect to play bhuvan in lagaan remake
रणवीर सिंह, विक्की कौशल की रणबीर कपूर? 'लगान'च्या रिमेकसाठी अमिरची कोणाला सर्वाधिक पसंती

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता अमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाने १५ जून रोजी तब्बल २० वर्षे पूर्ण केली. हा चित्रपट केवळ अमिर खानसाठीच खास ठरला नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही मैलाचा दगड ठरला. दुष्काळग्रस्त भागात दुसऱ्यांच्या शेतात राबवण्याचा शाप मिळालेल्या शेतकऱ्यांचे  क्रिकेट खेळताना पाहणेआजही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. यातच या चित्रपटाच्या शेवटी देण्यात आलेला मेसेज आजच्या परिस्थितीला साजेसा आहे. परंतु या चित्रपटाचा रिमेक करायचा झाल्यास ‘भुवन’ची भूमिका साकरण्यासाठी कोणता अभिनेता सक्षम असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर खुद्द भुवनअर्थात अमिर खाननेच दिले आहे.

‘लगान’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमिर खानने व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्सद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमिरने ‘लगान’ चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी ‘लगान’च्या रिमेकमध्ये ‘भुवन’ची भूमिका आजच्या घडीला कोणता अभिनेता चांगल्या पद्धतीने पार पडू शकतो असा प्रश्न अमिरला विचारण्यात आला. तेव्हा अमिरने सांगितले की, “आजच्या तारखेत अनेक उत्तम कलाकार आहेत. रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल हे उत्तम कलाकार आहेत. कदाचित भुवनची भूमिका माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने हे कलाकार पार पाडू शकतात.”

अमिरने पुढे मस्करीत सांगतो की, “‘लगान’चा कोणी रिमेक करु इच्छित असल्यास मी आणि आशुतोष त्याचे राईट्स द्यायला तयार आहे. पण या चित्रपटासाठी आम्ही ज्या अडचणींमधून गेलो त्या अडचणींचाही त्यांनी सामना करायला हवा, करा भावानों, आम्हाला पाहायचेय. की आजचे तरुण कलाकार कसे काम करतात हे मलाही पाहयला आवडेल.”

‘लगान’ हा माझ्यासाठी एक प्रवास होता.’

अमिर सांगतो की,”‘लगान’ हा माझ्यासाठी एक प्रवास होता. जो आजही सुरु आहे. काही लोक या प्रवासात लवकर सामील झाले तर काही नंतर आले. आमची टीम, कास्ट क्रूहे सर्व लवकर आले. परंतु तुम्ही लोक आणि माझे प्रेक्षक माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.”

‘लगान’ हा सुपरहिट चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा तिसरा चित्रपट आहे. त्यांनी ‘पेहला नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्यानंतर अमिर खान आणि ममता कुलकर्णी यांना मुख्य भूमिकेत घेऊन ‘बाजी’ चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात पहिल्यांदाच अमिर खानची जबरदस्त अॅक्शन पाहयला मिळाली.