घरमुंबईपालिकेच्या ४९ केंद्रांवर लसीकरण सुरू

पालिकेच्या ४९ केंद्रांवर लसीकरण सुरू

Subscribe

मुंबईत लसीचा साठा संपुष्टात आल्याने पुणे येथून लागलीच १ लाख लसीचा साठा शनिवारी पहाटे मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे आज पालिकेच्या ४९ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस देण्यात आली. मात्र लसीकरणासाठी काही ठिकाणी मोठी गर्दी करण्यात आल्याने डॉक्टर व लाभार्थी , काही ठिकाणी नागरिकांमध्येच शाब्दिक चकमकीचे प्रकार घडले.

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून लसीचा साठा कमी कमी होत गेल्याने कालपर्यँत १२० लसीकरण केंद्रांपैकी तब्बल ९० केंद्रे बंद पडली होती. त्यामुळे उर्वरित ३० केंद्रांवरच लसीकरण कसेबसे सुरू होते. सुदैवाने आज पहाटेच्या सुमारास पुणे येथून लसीचा साठा मुंबईत आणण्यात आला. हा साठा लगेचच लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात आला.

- Advertisement -

त्यामुळे पालिकेच्या ४९ केंद्रांवर ही लस देण्याचे नियोजन करण्यात आले. ज्यांना लसीकरणाबाबत मोबाईलवर मेसेज पाठविण्यात आला त्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. पालिकेने अगोदरच नियोजन केल्याप्रमाणे १०, ११, १२ एप्रिल रोजी ७१ खासगी रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र पालिकेच्या ४९ केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्यात आले. काही ठिकाणी लसीकरणासाठी रांग लावली असताना गर्दी जास्त होऊन तेथे वादविवाद झाले. काही ठिकाणी डॉक्टरांशीही वाद झाल्याचे समजते.

मुंबईला १५ एप्रिल रोजी लसीचा मोठा साठा देण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत पालिकेला उपलब्ध लसीचा साठा पुरवून वापरावा लागणार आहे. जर आज उपलब्ध साठा दोन दिवसात संपुष्टात आल्यास १५ एप्रिलपर्यंत पालिकेला राज्य सरकारमार्फत कुठूनही नवीन साठा उपलब्ध करावा लागेल, अन्यथा १५ तारखेपर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -