BMC Budget 2021 : महापालिका CBSC बोर्डाच्या १० नवीन शाळा सुरू करणार

BMC CBSC school

महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या शाळांना शैक्षणिक वर्ष 20-21  मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच १० नवीन सीबीएससी बोर्डाच्या दहा शाळा मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. शहरातील दहा ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई शहर विभागात २, पश्चिम उपनगरामध्ये ३ आणि पूर्व उपनगरामध्ये एकुण ५ शाळा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठीच २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात (BMC Budget 2021) याबाबतची घोषणा करण्यात आली.

स्थानिक जनतेचं मत जाणून घेत 21-22 या शैक्षणिक वर्षांपासून CBSE बोर्डाच्या शाळा सुरू करण्यासाठी शहरातील 10 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. CBSE  मंडळाच्या पोट कायद्यानुसार 40 विद्यार्थ्यांची 1 तुकडी याप्रमाणे या शाळेतील वर्ग असतील. सुरूवातीच्या टप्प्यात ज्युनिअर केजी, सिनियर केजी  ते इयत्ता 6 वी पर्यंत शाळा सुरू होतील असा उल्लेख अर्थसंकल्पात आहे. तर फेब्रुवारी 2021 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याआधीच्या शैक्षणिक वर्षात मुंबई महापालिकेने १० शाळांची सुरूवात केली होती. या सर्वच शाळांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच आणखी दहा शाळांसाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. आजच्या

विज्ञान कुतुहल भवनांची निर्मिती

विद्यार्थ्यांना विज्ञानातील कठीण संकल्पनांचे आकलन व्हावे यासाठी विज्ञान प्रतिकृतींची निर्मिती ही विज्ञान कुतुहल भवनामध्ये केली जात आहे. एकुण १२३ प्रतिकृती निर्माण करण्यात येत असून हरियाली व्हिलेज विक्रोळी येथे ६२ तर विलेपार्ले पूर्व येथील शाळेत ६१ वैज्ञानिक प्रतिकृती या शिक्षकांमार्फत तयार करण्यात येत आहेत. सन २०२० -२१ या वर्षात विज्ञान कुतुहल भवन येथे प्रतिकृती नूतणीकरणाचे काम सुरू असून आरोग्य दालन आरसे, विज्ञान दालन, आरसे महल, खगोल दालन या सर्व प्रतिकृतींचे शिक्षकांमार्फत नवनिर्मितीचे काम सुरू आहे.