घरमुंबईशहर, उपनगरात पालिका उभारणार जम्बो कोविड सेंटर 

शहर, उपनगरात पालिका उभारणार जम्बो कोविड सेंटर 

Subscribe

दोन ते तीन दिवसांत या जम्बो कोविड सेंटरचे काम सुरु करण्यात येणार असून १५ दिवसांत तीन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

मुंबई महापालिका कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लवकरच शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा तीन ठिकाणी प्रत्येकी एक हजार क्षमतेची तीन जम्बो कोरोना सेंटर उभारणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या जम्बो कोविड सेंटरचे काम सुरु करण्यात येणार असून १५ दिवसांत तीन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने शहर व उपनगरातील सरकारी, पालिका व खासगी रुग्णालये येथील सर्व खाटा रुग्णांनी भरल्या आहेत. कोरोना रुग्णांना खाटा मिळणे, ऑक्सिजन, आयसीयू, रक्त मिळणे देखील कठीण होत आहे. तर दुसरीकडे लसींचा तुटवडा झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर होऊन ९० केंद्रे लसीअभावी बंद पडली आहेत.

कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासत असून अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक हे खाटा मिळत नसल्याबाबत तक्रारी करत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खाटाच उपलब्ध झाल्या नाहीत, तर सरकार व पालिकेची मोठी नाचक्की होणार आहे. ही बाब लक्षात घेता पालिकेने मुंबई शहरात एखादी चांगली जागा निश्चित करुन तेथे एक हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर, पूर्व उपनगरात कांजूरमार्ग येथे एक हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर, तर पश्चिम उपनगरातील मालाड येथे एक हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर असे एकूण तीन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे जरी रुग्णांची संख्या वाढली तरी खाटा उपलब्ध होणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत या जम्बो कोविड सेंटरचे काम सुरु करण्यात येणार असून १५ दिवसांत तीन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -