घरमुंबईस्थायी समितीवर यशवंत जाधव यांची हॅटट्रीक; शिक्षण समितीवर संध्या दोशी

स्थायी समितीवर यशवंत जाधव यांची हॅटट्रीक; शिक्षण समितीवर संध्या दोशी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुन्हा यशवंत जाधव यांच्यावरच पक्षाने विश्वास टाकला आहे. यशवंत जाधव यांचा पत्ता कापून अन्य नगरसेवकाची या पदी वर्णी लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असतानाही यशवंत जाधव हे उमेदवारी मिळत अध्यक्षपदाची हॅट्रीक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, सर्व विरोधानंतही यशवंत जाधव यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आहे. दरम्यान, शिक्षण समितीत निष्ठावान शिवसैनिकांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत येत नगरसेवक बनलेल्या कांदिवलीतील संध्या दोशी यांना शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेतील निष्ठावान नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या ५ ऑक्टोबर रोजी होत असून यासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज अनुक्रमे यशवंत जाधव व संध्या दोशी यांनी महापालिका चिटणीस संगिता शर्मा यांना सादर केले. यशवंत जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा समिती अध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरत पदाची हॅट्रीक साधणार आहेत. कोरोनो कोविडच्या काळात यशवंत जाधव यांच्यात महापौर यांच्यामध्ये शितयुद्ध सुरु असल्याने त्यांचा पत्ता कापण्याच्या जोरदार सुरु होत्या. त्यामुळे या चर्चांना जोरदार उधाण आले होते. परंतु २८ सप्टेंबर रोजी समितीवरील निवृत्त सदस्यांच्या रिक्त जागी सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि राजुल पटेल यांना समितीवर कायम ठेवण्यात आले. तर सानप यांच्या जागी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सदस्य म्हणून नेण्यात आले. त्यामुळे यशवंत जाधव यांनी पहिली खेळी जिंकून आपल्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तबच केला होता. मात्र,बुधवारी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाने केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज चिटणीस यांना सादर केला.

- Advertisement -

स्थायी समितीत भाजप आक्रमक असताना अन्य कुणाला उमेदवारी देण्यापेक्षा शिंगावर घेणाऱ्या जाधव यांच्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय नव्हता. त्यामुळे यशवंत जाधव यांना हॅट्रीक साधण्याची संधी दिली गेली.

शिक्षण समितीवर मागील यापूर्वी मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर, अंजली नाईक यांना संधी दिल्यानंतर पक्ष अन्य कुणाला संधी देईल, असे वाटत होते. परंतु पक्षाने कांदिवलीतील नगरसेविका संध्या दोशी यांना उमेदवारी दिली आहे. संध्या दोषी यांना मागील वर्षी आर-उत्तर व आर- मध्य प्रभाग समिती अध्यक्ष पद देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्याच वर्षी त्यांना शिक्षण समिती अध्यक्षपद देवून थेट स्थायी समितीत वर्णी लावल्याने एकप्रकारे शिवसेनेतील काही नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, संध्या दोशी यांनी कोविडच्या काळात आपल्या प्रभागामध्ये युवा सेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभिप्रेत असे काम केले होते. त्यामुळेच त्यांना या कामाची बक्षिसी दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

शिक्षण समितीचे पक्षिय  संख्याबळ

शिवसेना : ११
भाजप  :  ०९
काँग्रेस  : ०४
राष्ट्रवादी  काँग्रेस : ०१
समाजवादी पक्ष : ०१

स्थायी समितीचे पक्षिय संख्याबळ

शिवसेना : ११  अणिक एक शिक्षण समिती अध्यक्ष
भाजप  :  १०
काँग्रेस  : ०३
राष्ट्रवादी काँग्रेस : ०१
समाजवादी पक्ष  : ०१

हेही वाचा –

Babri Masjid Verdict : २८ वर्षांनी खटल्यातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -