घरताज्या घडामोडीVicky-Katrina Wedding: विक्कीने कतरिनाला घातलेल्या हिऱ्याच्या अंगठीची किंमत माहितेय का?

Vicky-Katrina Wedding: विक्कीने कतरिनाला घातलेल्या हिऱ्याच्या अंगठीची किंमत माहितेय का?

Subscribe

अखेर बॉलिवूडचे बहुचर्चित कपल विक्की कौशल-कतरिना कॅफ लग्नबंधनात अडकले. गेल्या महिन्याभरापासून विक्की-कतरिनाच्या लग्नाबाबतची जोरदार चर्चा सुरू होती. गुपचूप पद्धतीने जरी विक्की-कतरिनाने लग्न केले असले तरी, सात फेरे घेतल्यानंतर दोघांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले. कतरिना लाल रंगाच्या लेहेंगात आणि विक्की आयवरी सिल्क शेरवानीत खूपच सुंदर दिसत होते. या फोटोपैकी एका फोटोने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहेत. ज्यामध्ये कतरिनाच्या हातामध्ये साखरपुड्याची अंगठी दिसत होती. सध्या कतरिनाच्या या अंगठीची चांगलीच चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

विक्कीने कतरिनाला हिऱ्याची अंगठी घातली आहे. कतरिनाच्या साखपुड्याच्या अंगठीमध्ये निळ्या रंगाचा मोठा हिरा आहे. त्याच्या चारीबाजूला पांढरे हिरे दिसत आहेत. ही अंगठी टिफनी अँड कंपनीची असून आयात आकाराची आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, कतरिनाच्या हातातील सुंदर अंगठीची किंमत 9800 USD म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ७ लाख ४० हजार ७३५ रुपयांची आहे. एवढेच नाही तर कतरिनाचे मंगळसूत्र देखील खूपच सुंदर होते. कतरिनाने विक्कीला प्लॅटिनमची टिफनी सोलेस्टे अंगठी घातली आहे.

कतरिनाच्याने लग्नासाठी ट्रेडिशनल लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यावर भरजरी नक्षी होती. तसेच तिने मॅचिंग करण्यासाठी लाल रंगाचा दुपटा घेतला होता. तर विक्कीने आयवरी सिल्क शेरवानी घातली आहे. विक्की-कतरिनाचे आउटफिट लोकप्रिय फॅशन डिझाइनर सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केले होते. माहितीनुसार, सब्यसाचीने डिझाईन केलेल्या लेहेंगामध्ये २२ कॅरेट सोन्याचा वापर केला आहे.


हेही वाचा – Vicky-Katrina Wedding: विक्की-कॅटच्या लग्नाबाबत कंडोम कंपनीची पर्सनल कमेंट; युजर म्हणाले, ओ भाई….


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -