घरताज्या घडामोडीAryan Khan Bail Hearing: आर्यन पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे NCBचा जामीनाला विरोध;...

Aryan Khan Bail Hearing: आर्यन पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे NCBचा जामीनाला विरोध; ३८ पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या जामीनाला विरोध करत एनसीबीने असे मत मांडले की, ‘चौकशीत त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. अशी लिंक योग्यरित्या शोधण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे आर्यन पुराव्यासोबत छेडछाड करणे किंवा पळून जाणे किंवा साक्षीदारावर प्रभाव टाकणे हे नाकारता येत नाही. त्यामुळे आर्यनला जामीन देऊ नये.’ तसेच एनसीबीने ३८ पानांचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केले आहे. याप्रकरणात आर्यनच्या बाजूने आज सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी युक्तीवाद करणार आहेत.

- Advertisement -

आर्यनच्या वकिलांनी प्रभाकर साईलने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रसोबत काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनसीबीने हायकोर्टमध्ये प्रभाकर साईलच्या आरोपासंबंधित सांगितले की, ‘कोर्टात प्रकरण सुरू असताना दुसऱ्या ठिकाणी आरोप करणे हे प्रकरणावरील लक्ष भटकवण्यासारखे आहे.’ अशा प्रकारे एनसीबी युक्तीवाद करून आर्यनच्या जामीनाला विरोध करत आहे.

प्रभाकर साईल हा एनसीबीचा याप्रकरणातील पंच असून रविवारी त्याने मोठे खुलासे केले. याप्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींचा सौदा होत होता. मात्र १८ कोटींचा हा सौदा झाला आणि यातील ८ कोटी समीर वानखेडेंना आणि इतर सर्वांमध्ये वाटू घेण्याचे किरण गोसावीचे संभाषण ऐकल्याचे प्रभाकर साईलने सांगितले. त्यामुळे याप्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. मात्र आज तरी आर्यन खानला जामीन मिळतो की नाही? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -