घरताज्या घडामोडीBSNLची कासवगती : 5Gच्या जमान्यात 4G सेवा करणार लॉन्च

BSNLची कासवगती : 5Gच्या जमान्यात 4G सेवा करणार लॉन्च

Subscribe

4G नंतर आता भारतात लवकरच सर्वत्र 5G सेवा सुरू होणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी भारतातील 65 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. मात्र, BSNLची सेवा अद्याप कासवगतीने सुरू आहे. कारण 5Gच्या जमान्यात BSNL 4G सेवा सुरू करणार आहे.

4G नंतर आता भारतात लवकरच सर्वत्र 5G सेवा सुरू होणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी भारतातील 65 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. मात्र, BSNLची सेवा अद्याप कासवगतीने सुरू आहे. कारण 5Gच्या जमान्यात BSNL 4G सेवा सुरू करणार आहे. BSNL 2023च्या सुरुवातीला 4G सेवा लॉन्च करणार असून, या वर्षांच्या दुसऱ्या सहामाईत ही सेवा प्रत्यक्ष सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. (bsnl 4g launch date announced pushed to second half of 2023 read in marathi)

सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये 5G सेवा पुरवली जात आहे. 5G पूर्वी भारतात Jio, Airtel आणि Vodafone Idea ची 4G सेवा आधीच सुरू आहे. मात्र, आता BSNL 4G सेवा सुरू करत आहे. BSNLला 4G सेवा लॉन्च करायला उशीर का झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे 4Gनंतर म्हणजेच पुढच्या वर्षी 2024मध्ये BSNL 5G सेवा लॉन्च करणार असल्याची माहिती, केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

- Advertisement -

BSNL 4G सेवेसाठी तेजस नेटवर्कची मदत घेत आहे. TCS सिस्टम इंटिग्रेटरची भूमिका बजावेल. त्याच वेळी, सी-डॉट बीएसएनएलला देसी 4जी सुरू करण्यासाठी मदत करेल.

दरम्यान, सेवा लॉन्च होण्यास उशीर झाल्यास BSNLचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, 4G सेवा सुरू झाल्यास BSNLला ग्राहक वाढवण्याची खूप चांगली संधी आहे. कारण अनेक टेलिकॉम ऑपरेटर त्यांचे ग्राहक गमावत आहेत. BSNL ने आता 4G लाँच केला असता तर खूप फायदा झाला असता. पण लाँचिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हसन मुश्रीफांवरील कारवाईनंतर अजित पवार सरकारवर बरसले; म्हणाले, राजकीय द्वेषातून…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -