घरमुंबईफक्त पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही- राज ठाकरे

फक्त पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही- राज ठाकरे

Subscribe

राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. गुजराती माणूस हुशारच असतो ते आपल्याला कळतच असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील ताज हॉटेलमधील ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमादरम्यान राज यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्रात उद्योगाला पोषक वातावरण आहे म्हणून इतर राज्यातील लोक येऊन येथे उद्योग करतात. गुजराती माणून हुशारच आहे ते आपल्याला कळतंच आहे असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना टोला लगावला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुण उपस्थीत होते. उद्योगाची सुरुवात कशी करावी याची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

काय म्हणाले राज ठाकरे

मारवाड मधील मारवाडी आणि गुजरात मधला गुजराती हेच लोक उद्योग करतात हे डोक्यातून काढून टाका. ही लोक आपले राज्य सोडून महाराष्ट्रात उद्योग करण्यातसाठी महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात उद्योग करण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे ते येतात. फक्त गुजराती आणि मारवाडी लोकच उद्योग करत नाहीत तर मराठी मानसेही उद्योग करतात. आमचेच लोक आम्हाला कॉम्पलेक्स देतात. मराठी माणसाची संस्कृती उद्योगासाठी पोषक आहे. फक्त पुस्तक वाचून उद्योग करता येत नाही. मराठी लोकांना महाष्ट्रात उद्योगाचे वातावरण निर्माण केल्यामुळे मारवाडी आणि गुजराती लोक येतात. गुजराती माणूस हुशारच असतो ते आपल्याला दिसतच आहे. गुजराती माणूस शिकून स्वःताचा धंदा सुरु करतो म्हणून गुजराती माणसाला गुजराती माणूस कधीच कामावर ठेवत नाही.

- Advertisement -

‘याशाची गुरुकिल्ली’ कुठे आहे आम्हाला अजून नाही सापडली. अशी पुस्तके वाचून उद्योजक होण्याची स्वप्न बघू नका. उद्योगात यशस्वी झालेल्यांची पुस्तके वाचा. तुम्ही चांगल्या राज्यात जन्म घेतला हे तुमचे नशीब आहे. दुसऱ्या राज्यात जाऊन बघा काय परिस्थीती आहे ती. चटके आणि फटके खाल्ल्या शिवाय काहीच मिळत नाही. मग ते उद्योग असो की राजकारण. गुजराती लोकांना काही प्रयत्न करावे लागत नाही कारण ते डायरेक्ट उद्योजकच होतात. चित्रपट क्षेत्रातील उद्योग हा इतर राज्यांनाही आपल्याकडे आकर्षीत करतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -