घरमुंबईक्षुल्लक वादातून तरुणाला १०० मीटरपर्यंत नेले फरफटत

क्षुल्लक वादातून तरुणाला १०० मीटरपर्यंत नेले फरफटत

Subscribe

क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाला कारचालकाने १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना मालाड येथे घडल्याचे समोर आले आहे.

क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर कारचालकाने एका तरुणाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मालाड येथे घडली असून या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत.

यावरुन झाला तरुण आणि कारचालकात वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड येथील लिंक रोडवरुन एक कार जात होती. त्यादरम्यान पदपथावरुन शेर अली शेख तेथून चालत होता. त्या दरम्यान या कारचा आरसा शेर अली खानला लागला. यावरुन शेर अली शेख आणि कारचालक यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. काही वेळाने कार निघून गेल्यानंतर शेर अली शेख त्या मार्गावरुन चालू लागला. शेर अली शेखला वाद संपल्याचे वाटले. मात्र त्या कारचालकाने पुढे जाऊन वळण घेतलं आणि पुन्हा मागे येऊन जोरदार धडक दिली.

- Advertisement -

‘मला वाटलं प्रकरण संपल आहे. पण कारने पुन्हा परत येऊन धडक दिल्याने मी रसत्यावर जाऊन पडलो. पण यानंतरही त्यांने कार थांबवली नाही आणि मला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं’, अशी माहिती शेर अली शेखने दिली आहे. कारचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असला तरी ते देखील त्या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीने त्या कार चालकाचा नंबर नोंद करुन घेतला आहे.

कुरियर बॉयने केली मदत

या घटने दरम्यान तेथून जाणाऱ्या एका कुरिअर बॉयने शेर अली शेखची मदत केली आणि त्याच्या कुटुंबाला कळवून त्यांनी शेर अली शेखला गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र शेर अली शेख यांची प्रकृती गंभर असल्याने त्यांना केईएण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा – क्षुल्लक वादातून इसमाची गळा आवळून हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -