घरमुंबईमहापौर बंगल्यावरच उभारणार बाळासाहेबांचे स्मारक!

महापौर बंगल्यावरच उभारणार बाळासाहेबांचे स्मारक!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगला योग्य असल्याची चर्चा सुरु होती. या सर्व चर्चानंतर या बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निश्चित झाली आहे. या बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर निश्चित झाली आहे. बाळासाहेबांचे स्मारक दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्यावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता या बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवाजी पार्कचा महापौर बंगला सोडून राणीच्या बागेतील पर्यायी निवासस्थानी राहायला जावे लागणार आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात स्मारकाच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हे राजभवनही मागतील – राज

- Advertisement -

स्मारकासाठी बंगल्याची तोडफोड नाही

शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा आहे. हा बंगला १९२८ साली बांधण्यात आला होता. मुंबई महापालिकेने १९६२ साली या बंगल्याला विकत घेतले होते. डॉ. बी.पी. देवगी यांना महापौर म्हणून बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला होता. हा बंगला म्हणजे एक ऐतिहासिक वास्तू आहे. या बंगल्याचा अंडरग्राउंड परिसर हा ९००० स्क्वेअर फूटचा आहे. तर बंगल्याची वास्तू २३०० स्क्वेअर फूटांची आहे. या बंगल्याला पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या वास्तूचे जतन करणे म्हत्त्वाचे आहे. स्मारक बांधल्यानंतर या वास्तूचे रुपांतर पर्यटन स्थळात होईल. त्यासाठी या बंगल्याच्या तळघरात म्हणजे अंडरग्राऊड भागात बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यामुळे बंगल्याच्या आवारातील झाडेही सुरक्षित राहणार आहेत. शिवाय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तूची मोडतोड केली जाऊ नये आणि बंगल्याच्या परिसरातील झाडांचीही कत्तल होऊ नये.


हेही वाचा – बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी महापौर बंगला स्मारकासाठी होतोय हवाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -