घरताज्या घडामोडी५० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस उपाधीक्षकासह ४ जणांवर गुन्हा

५० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस उपाधीक्षकासह ४ जणांवर गुन्हा

Subscribe

शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवून देतो, तसेच गोठवलेले बँक खाते पूर्ववत करून देण्याच्या नावाखाली ५० लाख रुपयांची लाच मागणारे शहापूर तालुक्यातील पोलीस उपधीक्षक यांच्यासह ४ जणांविरुद्ध ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकावर काही महिन्यांपूर्वी किन्हवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात बांधकाम व्यवसायिकाला अटक झाली होती. या गुन्हयात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी तसेच गोठवलेले बँक खाते पूर्ववत करून देण्यासाठी या बांधकाम व्यवसायिकाकडे ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपधीक्षक दिलीप सावंत यांनी काही खाजगी इसमांना मध्यस्थी करून ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १२.५ लाख रुपये देण्याचे ठरले.

- Advertisement -

याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यवसायिकाने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावरून शुक्रवारी शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपधीक्षक दिलीप सावंत, खासगी इसम ओंकार पातकर, आकाश सावंत आणि सचिन रांजणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -