घरमुंबईमध्य रेल्वेकडून जीपीएस आधारित ४१६ हॅण्डबॅण्डची खरेदी

मध्य रेल्वेकडून जीपीएस आधारित ४१६ हॅण्डबॅण्डची खरेदी

Subscribe

रेल्वे ट्रॅकमध्ये सातत्याने पेट्रोलिंगची ड्युटी करणाऱ्या रेल्वेच्या गँगमन आणि ट्रॅकमन यांच्या मदतीसाठी आता हॅण्डबॅण्डची खरेदी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून ४१६ जीपीएस आधारित हॅण्डबॅण्ड खरेदी केले आहेत. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरील बिघाडाचे नेमके ठिकाण काय आहे हे नियंत्रण कक्षाला एका क्षणात कळण्यासाठी मदत होणार असून गँगमनचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

लोकल सेवा अखंडपणे चालवण्यासाठी रेल्वे रुळांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या ट्रॅकमनचे काम अनुल्लेखनीय असते. ऊन असो वा पाऊस रेल्वे ट्रॅकमध्ये सातत्याने पेट्रोलिंगची ड्युटी करणाऱ्या रेल्वेच्या गँगमन आणि ट्रॅकमन यांच्या मदतीसाठी आता हॅण्डबॅण्डची खरेदी करण्यात आली आहे. गँगमन आणि ट्रॅकमन यांच्याकरता जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित हॅण्डबॅण्ड तयार करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने आपल्या ३३९ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवरील पेट्रोलिंग चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तब्बल ४१६ जीपीएस आधारित हॅण्डबॅण्ड खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरील बिघाडाचे नेमके ठिकाण काय आहे हे नियंत्रण कक्षाला एका क्षणात कळण्यासाठी मदत होणार असून सुरक्षित प्रवास होण्यास मदत होणार आहे.

काय आहे रेल्वेच्या गँगमनचे काम

रेल्वेतील गँगमनना रेल्वेचे डोळे आणि कान असे संबोधले जाते. कारण हीच माणसे दिवसरात्र ऊन – पावसात देखील काम करत असतात. रेल्वेच्या गँगमनना दहा ते बारा किलोचे वजन अंगावर घेऊन ट्रॅकची देखभाल करण्यासाठी फिरावे लागते. हातोडा ठोकून रुळांच्या एकेक चाव्या टाईट करणे, त्यांना वंगण लावणे, ट्रॅकला तडा आहे का याची पाहणी करणे अशी कामे त्यांना रोजच करावी लागतात.

- Advertisement -

गँगमनकडून दिवसाचे २४ तास पेट्रोलिंग केले जाते

रेल्वेमधील बहुतांश गँगमन म्हणजेच ट्रॅकमन हे वयाची पन्नाशी ओलांडलेले असून ते अतिशय थकलेले आहेत. तरी देखील त्यांच्याकडून रेल्वेच्या ट्रॅकच्या सुरक्षेसाठी दिवसाचे २४ तास पेट्रोलिंग केले जाते. दोन तासांच्या कालावधीत गँगमन साधारणपणे चार कि.मी.चा ट्रॅक पालथा घालतात. त्यानंतर तो आपल्या सहकारी गँगमनला इन्स्पेक्शन डायरी सुपूर्द करतो. त्यानंतर तो कर्मचारी पुढील चार कि.मी. ट्रॅकचे निरीक्षण करून काही बिघाड दिसल्यास पुढील येणारी गाडी थांबवून नियंत्रण कक्षाला माहिती कळवतात. परंतु, आता गँगमनच्या हातात जीपीएस तंत्रज्ञान आधारित हॅण्डबॅण्ड बांधल्याने बिघाडाची माहिती ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिममुळे रेल्वेच्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षात एका क्षणात कळण्यास मदत होणार आहे.

तसेच काही वेळा ट्रॅकमन अपेक्षित अंतर पायी न चालता वाहनाचा किंवा अन्य मार्गाचा वापर करून गाठण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी या जीपीएस हॅण्डबॅण्डचा वापर करता येणे शक्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -