चंद्रकांत पाटील स्वतःची ग्रामपंचायत राखण्यात अपयशी – बाळासाहेब थोरात

विदर्भात ५० टक्के जागांवर काँग्रेसचा विजय

Chandrakant Patil fails to maintain his own Gram Panchayat - Balasaheb Thorat
चंद्रकांत पाटील स्वतःची ग्रामपंचायत राखण्यात अपयशी - बाळासाहेब थोरात

राज्यात सुमारे १४ हजार ग्रामपंयाचत निवडणूकींची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शुक्रवार १५ जानेवारीला राज्यात ग्रामपंचायत निवडणुक मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणूकींच्या निकालानूसार महाविकास आघाडीने ८० टक्के जागेवर आपले वर्चस्व मिळवले असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच चंद्रकांत पाटलांना स्वतःची ग्रामपंचायत राखता आली नाही असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवला आहे. तसेच राज्यात अनेक जिल्ह्यात काँग्रेसने जागा जिंकल्या असल्याचा दावाही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा जनाधार मिळाला आहे. सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने केलेल्या कामावर राज्यातील नागरिक समाधानी आहेत. विदर्भात काँग्रेसने ५० टक्के जागांवर विजय मिळवला असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. १४ हजार ग्रामपंयातीत घेण्यात आलेल्या निवडणूकीत ४००० ते ४५०० ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मराठवाड्यातही काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची पिछेहाट झाले असल्याचे या निवडणूकीच्या माध्यमातून दिसले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर नागरिकांनी मोठा विश्वास दाखवला आहे. तसेच विदर्भ, पश्चिमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सरशी असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आपली ग्रामपंचायत राखण्यात अपयशी

ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न करुन स्वतःची ग्रामपंचायत राखण्यात अपयशी ठरले आहेत. राज्यात भाजपापेक्षा महाविकास आघाडीतील तीन पक्षांना नागरिकांनी विश्वास दाखवला आहे. हे आम्ही केलेल्या कामाचे यश आहे. निकालानुसार भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.