घरमुंबईमुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; संजय राऊत यांचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; संजय राऊत यांचा पुनरुच्चार

Subscribe

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होणार असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होणार असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आज, मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रहण सुटेल आणि शपथग्रहण होणारच, असा दावाही केला. राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे त्यांच्या बोलण्यावरून पाहायला मिळाले. सध्या राज्यात आणि दिल्लीतही सत्ता स्थापनेवरून खलबत सुरु आहेत. भाजप-सेनेकडून कोणतीच ठोस भूमिका मांडली जात नसताना, संजय राऊत मात्र शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा आशावाद दर्शवत आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत

लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भाजपाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले. तसेच नव्या सरकारच्या स्थापनेमध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही राऊत म्हणाले. शिवसेनेच्या समर्थकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे कशाची फाईल आहे, आमदारांची नावे त्यात आहेत का, असा प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले की, आमच्याकडे सगळे काही आहे आणि आमच्याकडे काय काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच शरद पवार हे देशाचे फार मोठे नेते आहे. त्यांना राज्यात बोलावू नका. शरद पवार मुख्यमंत्री होणार ही अफवा असून अशा अफवा बंद करून टाका, असे शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले.

हेही वाचा –

राज्यात खिचडी पकतेय : CM सेना, DCM राष्ट्रवादी तर Speaker काँग्रेस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -