घरमुंबईया शाळेतील विद्यार्थी गिरवणार जीवन कौशल्याचे धडे!

या शाळेतील विद्यार्थी गिरवणार जीवन कौशल्याचे धडे!

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळातील ११२ शिक्षकांचे तीन सत्रात नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.

आदिवासी आश्रम शाळातील मुलांना निरोगी आरोग्यासाठी पुरेसा आहार कोणता घ्यावा? स्वच्छता कशी बाळगावी? आपली निर्णय क्षमता कशी वाढवावी?, असे जीवन कौशल्याचे धडे मिळणार आहेत. शिक्षकांकडूनच मुलांना हे धडे देण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. ठाणे-पालघर जिल्ह्यात आदिवासी संख्या जास्त असल्याने तेथे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तीन सत्रात शिक्षकांना प्रशिक्षण

आदिवासी विकास विभाग, महिला बाल विकास, आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरातील ५५७ अनुदानित आश्रम शाळेतील अंदाजे २२२८ शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळातील ११२ शिक्षकांचे तीन सत्रात नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. आदिवासी विभागात असलेली कुपोषणाची समस्या लक्षात घेता पौष्टिक आहार कसा मिळेल? आहाराच्या आधी तसेच दैनंदिन जीवनात स्वच्छता कशी बाळगावी? याचे शिक्षण शिक्षकांना देण्यात आले. आदिवासी मुलांमध्ये भाषेची अडचण मोठी असते. त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. मानसिकदृष्ट्या या मुलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास कसा तयार होईल? याकडे शिक्षकांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यांच्या करिअरसाठी आपले योगदान देणे या गोष्टी शिक्षकांना शिकवण्यात आल्या.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून राष्ट्रवादीचे २५ जण इच्छुक

मुलांचे भवितव्य घडविण्यास प्रशिक्षणाचा फायदा

आदिवासी मुलांना मूल्यशिक्षण, संस्कार, स्वच्छतेचे महत्व, आरोग्याची काळजी याबरोबर मुलांची मानसिक गरज तसेच किशोरवयीन काळात त्यांच्यात स्वत:मध्ये घडत असलेल्या मानसिक व शारीरिक बदलांची त्यांना जाणीव करून देणे, या दिवसात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? मुलांना कसे समजावून सांगावे? याची माहिती प्रशिक्षकांतर्फे आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांना देण्यात आली. ”शिक्षक म्हणून आदिवासी क्षेत्रात आदिवासी मुलांबरोबर काम करताना त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावे लागते. त्यांच्याशी कसा संवाद साधावा? त्यांना काय शिकवावे? जीवनात कसे उभे राहावे? याची माहिती या प्रशिक्षणामुळे मिळाली. आमच्या मनातील अनेक शंकांची उत्तरे यामुळे मिळाली. याचा उपयोग आदिवासी मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी होईल,” असा विश्वास प्रशिक्षणासाठी आलेल्या एका शिक्षिकेने व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -