घरमुंबईलहान मुलांचाही उत्स्फूर्त गोविंदा

लहान मुलांचाही उत्स्फूर्त गोविंदा

Subscribe

मुंबईत पुरुष आणि महिला गोविंदा पथकांमध्ये दहिहंडी फोडण्यासाठी चढाओढ लागली असताना घाटकोपरमधील लहान मुलांनी स्थापन केलेल्या हौशी गोविंदा पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. न्यायालयाने लहान मुलांना थरावर चढवू नये असे म्हटले असले तरी, आम्हाला दहिहंडी साजरी करायची आहे असे म्हणत या लहान गोविंदानी थर उभारून सलामी दिली.

घाटकोपर पश्चिम येथील एम जी रोड स्थानिक व्यापारी मंडळ आणि काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांच्या संयुक्त विद्यमाने सॅनिटरी लेन येथे १२ व्या वर्षी दहिहंडीचे आयोजन केले होते. या ठिकाणी पुरुष आणि महिला गोविंदा पथकांनी सलामी देण्यासाठी रीघ लावली होती. महिला आणि पुरुषांची गोविंदा पथके एकावर एक थर लावून सलामी देत असतानाच लहान मुलांनी स्थापन केलेले एक गोविंदा पथक आले आणि आम्हालाही ठार लावायचे आहेत असते आयोजकांना सांगू लागले. लहान मुले असल्याने आधी आयोजकांनी नकार दिला त्यानंतरही मुल आपला हट्ट सोडत नव्हते. अखेर लहान मुलांना हौस पूर्ण करता यावी म्हणून आयोजकांनी ठार लावण्याची परवानगी दिली. बघता बघता या लहान मुलांनी ऐकावर एक थर लावत चक्क पाच थर लावले आणि उपस्थितांसह सर्वांनीच त्यांचे टाळ्या वाजवून उस्फुर्त प्रतिसाद दिला.

या लहान गोविदांशी संपर्क साधला असता, आम्ही घाटकोपर पश्चिम येथील गोळीबार रोड तरुण विकास मित्र मंडळ येथे राहतो. आमच्या गोविंदा पथकात ३० मुलं आहेत. गेले दोन आठवडे आम्ही थर लावण्याचा सराव करत होतो. कोर्टाने लहान मुलांना गोविंदामध्ये थराच्यावर चढवू नये असे आदेश दिले आहेत. आम्ही सर्व लहान आहोत. पण आम्हालाही दहिहंडी साजरी करायची आहे. आम्ही आयोजकांना स्वता विनंती केली, ते आम्हाला परवानगी देत नव्हते. आम्ही मात्र हट्ट करून बसलो होतो म्हणून अखेर आम्हाला थर लावण्याची परवानगी दिली. या ठिकाणी आम्ही यशस्वी थर लावल्याने आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आता आम्ही घाटकोपरमध्ये सर्व दहिहंडीला भेटी देऊन थर लावणार असल्याची माहिती आयुष भोसले, सिद्धेश पाथरे व सुजल मोकाशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -