कल्याण तळोजा रोडला लागून असलेल्या बबलू धाब्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रेलरखाली झोपलेल्या क्लीनरचा विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातातील आरोपी ट्रेलर चालक फरार झाला असून, या प्रकरणी हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपी ट्रेलर चालकाचा शोध घेत आहेत.
कल्याण तळोजा रोडला लागून असलेल्या बबलू धाब्यावर सोमवारी रात्री गुजरात येथील द्वारका जिल्ह्यातून आलेला ट्रक चालक जेठाभाई हाथी यांनी विश्रांतीसाठी आपला ट्रक पार्क केला होता. यावेळी ट्रक चालक जेठाभाई यांचा मेव्हणाही त्यांच्यासोबत होता. मात्र ट्रकमध्ये गरम होत असल्याने नारायण भाई फफल हा ट्रक बाहेर येऊन ट्रकच्या शेजारी उभ्या असलेल्या एका ट्रेलरखाली झोपण्यास गेला.
हेही वाचा – कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफ तुटले; दोन महिला जखमी
ट्रेलरखाली झोपणे जीवावर बेतले
मात्र मध्यरात्री २ वाजता ट्रेलरखाली नारायणभाई गाढ झोपेत असताना, ते ज्या ट्रेलरखाली झोपले होते. त्या ट्रेलर चालकाने आपले वाहन सुरू केले. मात्र हजारो टन वजनाच्या अवजड ट्रेलरचे मागील चाक नारायणभाई यांच्या पोटावरून गेल्याने या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र ट्रेलर चालकाने या अपघाताची पोलिसांना माहिती न देताच तेथून पळ काढला. अखेर या घटनेबाबत त्यांचे नातेवाईक हाथी यांना कळताच त्यांनी या प्रकरणी हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेतील आरोपी ट्रेलर चालकाचा शोध घेत आहेत.