घरमुंबई'ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत काँग्रेसने उत्तरे द्यावी'

‘ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत काँग्रेसने उत्तरे द्यावी’

Subscribe

ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या घोटाळ्याचा सर्वात मोठा फायदा काँग्रेसला झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तीयन मिशेल याने ईडीच्या चौकशी दरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतले होते. याबबतची माहिती ईडीने न्यायालयात दिली होती. याच मुद्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षावर आरोप केले आहेत. या घोटाळ्यावर बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. या घोटाळ्याचा सर्वात मोठा फायदा काँग्रेसला झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या घोटाळ्याविषयी काँग्रेस परिवाराने उत्तरे द्यावी, असे देखील फडणवीस म्हणाले. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत भाजप नेते माधव भंडारी, केशव उपाध्ये आणि गिरीश महाजन उपस्थित होते.

हेही वाचा – ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरण: आरोपी मिशलने घेतले सोनिया गांधी यांचे नाव

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इटालियन कोर्टाने ऑगस्टा वेस्टलॅंडप्रकरणी दिलेल्या निर्णयामध्ये सोनिया गांधी यांचे नाव चार वेळा आले आहे. त्यामुळे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेस परिवाराने उत्तरे द्यावे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मिशेल याची चौकशी ईडी करत असून तो चौकशीदरम्यान माहितीही देत आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. मिशेलने दिलेल्या माहितीत सोनिया गांधी यांचे नाव आले आहे. त्याचबरोबर या घोटाळ्यात इटालिअन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, असा उल्लेख आला आहे. त्यामुळे यात गांधी कुटुंबाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा – Agusta Westland chopper case : सोनियांविरोधात षडयंत्र – शरद पवार

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी ३ हजार ६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती. इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली करण्यात आला होता. यामधील ८ हेलिकॉप्टर्स राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वापरली जाणार होती. तर उर्वरित ४ इतर कारणांसाठी वापरली जाणार होती. परंतु, या व्यव्हारामध्ये लाचखोरी झाल्याचे उघड झाले. हा व्यवहार व्हावा म्हणून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने देशातील विविध लोकांना ३६० कोटी रुपयांपर्यंत लाच दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर हा व्यवहार १ जानेवारी २०१४ रोजी रद्द करण्यात आला. या प्रकरणी माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, तत्कालीन प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची देखील नावं आली होती. या प्रकरणाची खटला सध्या न्यायालयात सुरु असून ईडी याची चौकशी करीत आहे. ईडी या घोटाळ्यातील मुख्य आरोपी ख्रिस्तीयन मिशेलची कसून चौकशी करत आहे. मिशेलने ईडीच्या चौकशीत सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र, तो उल्लेख का केला आहे, याचा तपास ईडी घेत लावत आहे.


हेही वाचा – ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; मिशेलला २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयिन कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -