घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं 'हे' उत्तर, वाचा सविस्तर...

आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं ‘हे’ उत्तर, वाचा सविस्तर…

Subscribe

आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय.

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. मातोश्री निवासस्थानी येऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरूंगात टाकतील असं म्हटलं होतं. त्यावेळी ते रडले होते, असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय.

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांनी त्यांना गाठलं. यावेळी आदित्य ठाकरेंकडून झालेल्या त्यांच्यावरील आरोपांबाबत सवाल केला असता त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “आदित्य ठाकरे अजुन लहान आहेत” असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला.

यासोबत त्यांनी कर्नाटक बेळगाव विषयावरही भाष्य केलंय. “कर्नाटक बेळगाव विषयावर टीम तयार केली आहे. यात तज्ज्ञ वकील नेमण्यात येणार आहेत. शासनाचं बारीक लक्ष आहे. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालतोय.”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

तसंच राज्यात एक नंबरचं विकासकाम सुरु आहे, समृद्धी हायेव, शिवडी न्हावा शेवा, पुणे रिंग रोड, मेट्रोचं जाळं विणण्याचं काम सुरु आहे. बुलेट ट्रेनचं काम सुरु आहे. बंद पडलेले सर्व प्रकल्प आम्ही वेगाने पुढे नेत आहोत. याचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला होईल. लाखो-करोडोंची गुंतवणूक या महाराष्ट्रात येतेय, उद्योगपती महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज आपली प्रतिक्रिया दिली. “आदित्य ठाकरे बालिश आहेत”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहेत तो? काय आहे त्याला प्रतिष्ठा? बालिश आहे तो. एकनाथ शिंदे भाजपसोबत नाही गेले. ते शिवसेना पक्ष घेऊन आले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. तुम्ही आता शाळेतील मुलांचेही प्रश्न विचाराल का? असा संतप्त सवाल नारायण राणे यांनी केला आहे. अशा प्रश्नांची का दखल घेता. मी त्याचा उत्तर देणार. बालिशपणा आहे. काहीही बोलतो. कोणत्या वर्षात बोलले होते? असंही राणे म्हणाले.

राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणातील निकाल येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपबरोबर जाणार असल्याची चर्चा देखील जोरात रंगू लागली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारण आणखी कोणती नवी राजकीय घडामोडी घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -