घरमनोरंजनकौतुकास्पद! सोनू सुदला Forbes लीडरशीप अवॉर्ड

कौतुकास्पद! सोनू सुदला Forbes लीडरशीप अवॉर्ड

Subscribe

कोरोना संकटाच्या काळात अनेक गरजू, गरीबांच्या मदतीसाठी धावणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एका आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरले आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक मजुर, विद्यार्थ्यांना गावात किंवा शहरात पाठवण्यासाठी सोनूने खूप मेहनत घेतली. अनेकाच्या मदतीसाठी तो आजही धावून जातो. त्यामुळे सोनू सूदला मसीहा या उपाधी देण्यात आली. काहींनी तर त्याला देवाची उपमा दिली. त्याच्या समाजपयोगी कामाची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. आजपर्यंत सोनू सूदला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. त्याच्या या पुरस्कारांच्या यादीत आणखी एक महत्त्वाच्या पुरस्काराची भर पडली आहे.

आंतरराष्ट्रीय संस्था फोर्ब्सने लीडरशिप-अवॉर्ड २०२१ या अवॉर्डने नुकताच सोनू सूदचा सन्मान करण्यात आला. या अवॉर्डची माहिती स्वत: सोनू सूदने आपल्या ट्विटरवरून शेअर केली आहे. या पुरस्काराचा एक फोटो शेअर करत सोनूने आभार व्यक्त केले आहेत. या शेअर केलेल्या अवॉर्डवर कोविड-१९ हिरो असा उल्लेख करण्यात आला आहे. सोनूला हा पुरस्कार व्हर्चुअल पद्धतीने देण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळ्याचे माहिती ट्विटरवर शेअर करताच चाहत्यांकडून सोनू सूदचे अभिनंदन केले जात आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक लोकांच्या मदतीस धावून आला. अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी सोनूने खूप मदत केली. अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. याचबरोबर ट्विटरवरून मदत मागणाऱ्या प्रत्येकासाठी तो कायम तत्पर असतो. नुकताच भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटने सोनू सूदच्या कामाचा गौरव म्हणून स्पायजेट बोईंग ७३७ या विमानावर सोनूचा उल्लेखनीय मोठा फोटा झळकावला. या फोटोसह ए सॅल्यूट टू द सेव्हियर सोनू सूद अशी गौरवास्पद ओळ शेअर केली होती. हा फोटो देखील सोनू सूदने आपल्या ट्विटवर शेअर केला होता. विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली. आज मी माझ्या आई बाबांना मिस करत आहे.’ अशी भावनिक कॅप्शनसह हा फोटो सोनू सूदने शेअर केला होता.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -