घरमुंबईपरस्परविरोधी विधानांनी इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ

परस्परविरोधी विधानांनी इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ

Subscribe

वक्तव्य केले नसल्याचे स्पष्टीकरण, तर सुश्रुत संहितेतील दृष्टांत दिल्याचा दावा

पुत्रप्राप्तीचा संदेश देणारे मी कोणतेही विधान केले नसल्याचे इंदोरीकर महाराज यांनी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी आपण अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या सुश्रुत संहितेमधील एक दाखला दृष्टांत म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला, असल्याचे प्रसारमाध्यमाला सांगितले आहे. त्यामुळे इंदोरीकर हे परस्पर विधाने करून कायद्याची व समर्थकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. परस्पर विधानांमुळे इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे वक्तव्य करत इंदोरीकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अहमनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा समुचित प्राधिकारी यांनी इंदोरीकर यांना स्पष्टीकरण देण्याची नोटीस पाठवली होती. या नोटिशीला उत्तर देताना इंदोरीकर यांनी ‘मी ते वाक्य बोललोच नाही, मी असे कीर्तन केलेच नाही’, असे स्पष्टीकरण जिल्हा समुचित प्राधिकर्‍यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. मात्र हे स्पष्टीकरण देऊन काही तास उलटत नाहीत तोच इंदोरीकर यांनी ‘आपण अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या सुश्रुत संहितेमधील एक दाखला दृष्टांत म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला, त्यात माझा कोणता गुन्हा असा प्रश्न इंदोरीकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे. त्याचबरोबर त्यांनी कीर्तन करत असताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विवेचनातून दाखले देत असताना तो विषय ओघाने आल्याचेही त्यांनी एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी मी जे काही बोललो त्याला अनेक ग्रंथांचा आधार आहे.

- Advertisement -

वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस अभ्यासक्रमात हा विषय आहे, आयुर्वेदाचार्य वाग्भट यांचा ग्रंथ, सुश्रुत संहितेत, गुरुचरित्रात हे संदर्भ असून, त्यातील एक दृष्टांत आपण मांडल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे इंदोरीकर हे आपण पुत्रप्राप्तीचा संदेश देणारे विधान केले नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाला देत असताना दुसरीकडे मात्र त्यांनी आपण कोणतीही चूक केली नसून, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. या परस्परविरोधी विधाने करून इंदोरीकर महाराज हे आरोग्य विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे यातून दिसून येत आहे. आरोग्य विभागाची दिशाभूल करणारे स्पष्टीकरण व प्रसारमाध्यातील विधाने ही परस्पर विरोधी असल्याने आता इंदोरीकर यांच्या अडचणीमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -