घरमुंबईकाँग्रेसने कधीही हिंदू धर्मावर अन्याय केला नाही - शरद पवार

काँग्रेसने कधीही हिंदू धर्मावर अन्याय केला नाही – शरद पवार

Subscribe

विकास हेच लक्ष आहे सांगणारे नंतर हिंदू धोक्यात आहे, असे बोलू लागले आणि हिंदू आतंकवाद सुरु केला. कॉंग्रेसने कधीच धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मावर अन्याय केला नाही.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे अधिकृत उमेदवार मिलिंद देवरा यांच्या खेतवाडी येथे आज जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मोदींच्या बाजुने एखादी शक्ती असते आणि तीच शक्ती विरोधात जाते, त्यावेळी त्या शक्तीला आतंकवादी ठरवण्याचा त्याच्याविरोधात आरोप करण्याची नीती वापरली जाते. असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

पाच वर्षांत देशाची काय अवस्था झाली आहे. तसेच, विकास हेच लक्ष आहे असे सांगणारे नंतर हिंदू धोक्यात आहे. असे बोलून हिंदू आतंकवाद सुरु केला. कॉंग्रेसने कधीच धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मावर अन्याय केला नाही. मोदी यांनी ओमर अब्दुल्ला आतंकवादी आहे, असे म्हटले. त्यामुळे शरद पवार त्यांच्यासोबत कसे जातात, परंतु मी त्यांना विचारतो की एक वेळ होती त्यावेळी जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षासोबत भाजप होती. जेव्हा त्यांची सत्ता आली त्यावेळी भाजप सत्तेत त्यांच्यासोबत होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात फारुख अब्दुल्ला सुध्दा होते, असा सवालही शरद पवार यांनी केला.

- Advertisement -

यावेळी, पाच वर्षांत मोदी यांची हुकुमशाही पाहायला मिळत असून देशात अचानक नोटबंदी करुन ५०० आणि १००० च्या नोटांना कागदाचा तुकडा बनवून टाकला. यासह अनेक गोष्टी आहेत ज्याने देशाचे नुकसान झाले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

या जाहीर सभेदरम्यान शरद पवार यांनी असे आवाहनही की, ‘मिलिंद देवरा यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, यावेळी ते नक्की निवडून येतील. इथल्या समस्या सोडवण्यासाठी मिलिंद देवरा यांनी काम केले आहे. त्यांचे मुंबईकरांशी घट्ट नाते जुळलेले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात परिवर्तन आणण्याची संधी तुम्हाला आहे ही संधी घालवू नका.’

- Advertisement -

यावेळी, मिलिंद देवरा स्पष्ट कबूली देत म्हणाले की, ‘२००४, २००९ मध्ये शरद पवार साहेबांनी आशिर्वाद दिल्याने आणि याठिकाणी प्रचाराला आल्याने मी निवडून आलो’ मात्र, २०१४ मध्ये पवार साहेब सभांमध्ये व्यस्त राहिल्याने त्यांची सभा झाली नाही आणि पराभव झाला याची आठवण मिलिंद देवरा यांनी करुन दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उमेदवार मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर,राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन, नसीम सिद्दीकी, कॉंग्रेसचे आमदार नसीम खान, अमिन पटेल,राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक धात्रक आदींसह मित्रपक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -