उत्तर प्रदेश सरकारने गुजरात, पंजाब, दिल्लीत कार्यालय उघडण्याचा निर्णय का घेतला नाही? – सचिन सावंत

Congress opposes opening of Uttar Pradesh government office in Mumbai
Congress opposes opening of Uttar Pradesh government office in Mumbai

मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांसाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.या योगी सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्वतुळात पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाच्या हेतूबाबत प्रश्न उपस्थित केला असून त्यानी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना विचारात घेऊनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. देशातील अन्य राज्यांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशातील असंघटीत कामगार आहेत. गुजरात, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश सरकारने कार्यालय उघडण्याचा निर्णय का घेतला नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

देशात दरडोई उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे असंघटीत मजूर स्थलांतरीत होत आहेत. या मजुरांना उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या काळात वाऱ्यावर सोडलं होते. मग आता अचानक त्यांची आठवण का झाली? असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे. दुसऱ्या राज्यातील नागरिकांसाठी कार्यालय सुरू करणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य आहे. मुंबईत सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय नागरीक राहतात. ही आगामी मुंबई महानगर पालीकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणारी व्होट बँक आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे.