घरमुंबईमुंबईत नोकराने वृद्ध मालकिणीला दिले जेवणातून विष!

मुंबईत नोकराने वृद्ध मालकिणीला दिले जेवणातून विष!

Subscribe

घरच्या स्वयंपाक्यानेच वृद्ध मालकिणीला जेवणातून उंदीर मारण्याचे औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या कुलाबा या उच्चभ्रू भागामध्ये घडला आहे. पोलिसांनी आरोपी स्वयंपाक्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हल्ली अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये घरकामासोबतच जेवणासाठीही स्वयंपाकीच असतात. त्यामुळे अनेक भागांमध्ये स्वयंपाक घराचा पूर्ण ताबा याच स्वयंपाक्यांकडे असतो. मात्र, मुंबईतल्या एका उच्चभ्रू वस्तीतील एक महिला आणि तिच्या मुलीला त्यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या स्वयंपाक्यानेच विष दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात ही घटना घडली असून जेवणातून उंदीर मारण्याचं औषध खाऊ घालून या स्वयंपाक्यानं त्याची मालकीण आणि तिच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रकार समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी स्वयंपाक्याला अटक केली आहे.

अनेक दिवस देत होता औषध!

कुलाबा परिसरातल्या बख्तावर इमारतीमध्ये हा प्रकार घडला आहे. झिनिया खजोटिया नामक ६५ वर्षीय वृद्ध महिला या इमारतीमध्ये राहाते. या महिलेची दोन मुलं आणि एक विवाहित मुलगी अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्यामुळे ही महिला मुंबईत दोन नोकर आणि एक ३३ वर्षीय स्वयंपाकी रिजउल हक मंडल उर्फ मिलॉन यांच्यासोबत राहात होती. ६ ऑगस्ट रोजी खजोटिया सिंगापूरहून घरी परतल्या. त्यानंतर त्यांना घरातलं जेवण खाल्ल्यानंतर अचानक झोप येऊ लागली. विशेष म्हणजे दररोज हा प्रकार घडू लागला. काही दिवसांनी त्यांची मुलगीही अमेरिकेहून त्यांच्याकडे राहायला आली. तिलाही असाच अनुभव यायला लागला. जेवण झाल्यानंतर चक्कर येणे, झोप येणे असे प्रकार घडू लागले.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – भांडुप विषबाधा प्रकरण; पाण्यातील ‘ई कोलाय’मुळे विषबाधा


रुग्णालयात उघड झाला खरा प्रकार

काही दिवसांनी झिनिया यांना अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्या दोघी टाटा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या. दोघींच्या रक्ताची तपासणी केल्यानंतर त्यांच्या रक्तात थॅलियम नावाच्या विषारी पदार्थाचे घटक सापडले. उंदीर मारण्यासाठी थॅलियम पदार्थ वापरला जात असल्यामुळे दोघींवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या अहवालानंतर झिनिया खजोटिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांना अधिक तपास करत मिलॉन याला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -