घरCORONA UPDATECoronaVirus: केईएम हॉस्पिटलमधील परिचारिकेला कोरोनाची लागण

CoronaVirus: केईएम हॉस्पिटलमधील परिचारिकेला कोरोनाची लागण

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने विभागात राहणाऱ्या तसेच केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या एका २४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहने विभागात राहणाऱ्या तसेच केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या एका २४ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या परिचारिकेला तात्काळ सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये आज सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या कुटुंबियांना देखील पालिकेच्या आरोग्य विभागाने हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण

मोहने परिसरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असून हा विभाग सील करण्यात आला आहे. मोहने परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारी परिचारिका मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होती. कोरोना संदर्भात हॉस्पिटलने स्टाफ नर्सची रक्त तपासणी गुरुवारी केली होती. यात या २४ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती हॉस्पिटलमधून दूरध्वनीवरून देण्यात आली. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधून या महिलेला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मोहने परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे. तिच्या आईसह वडील, भाऊ आणि बहिणीलाही आरोग्य विभागाने उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले आहे.

- Advertisement -

मोहने परिसर सील 

या विभागाला पूर्णपणे सर्वेक्षणाखाली सील केले असून बाजूला राहत असणाऱ्या किमान २० ते २५ कुटुंबियांना होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. तसेच किमान १४ दिवस त्यांना घराबाहेर न पडण्याची ताकिद आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, मोहने परिसरातील नगरसेवक दयाशंकर शेट्टी, नगरसेविका सुनंदा कोट, शीतल गायकवाड यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नका आणि परिवाराची काळजी घ्या. असे आवाहन केले आहे.

हेही वाचा –

Coronavirus Lockdown: ‘३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -