घरताज्या घडामोडीआयटी उत्तरपत्रिकांचे करा ऑनलाईन मूल्यमापन

आयटी उत्तरपत्रिकांचे करा ऑनलाईन मूल्यमापन

Subscribe

शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांचे महाविद्यालयांना आदेश

नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) या विषयाच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासल्या जाणार आहेत. ज्या शिक्षकांनी हा विषय शिकवला आहे, त्यांनी http://assessment.mh-sc.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. या शिक्षकांना उत्तरपत्रिकांचे मूल्यमापक करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक तथा शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक यांना यासंबंधी सूचना पाठवण्यात येत आहेत. ज्या शिक्षकांना माहिती व तंत्रज्ञान विषय शिकवण्याचा तीन वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्यास त्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यांना या विषयाच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन घरून ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहे. उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करत असतांना गोपनीयता भंग होणार नाही याची संबधित शिक्षकांनी काळजी घ्यायची आहे. माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांकडे संगणक संच नसेल अशा सर्व शिक्षकांना संगणक संच पुरविण्याची जबाबदारी ही महाविद्यालयाची आहे. अधिक माहितीसाठी किंवा अडचण असल्यास माहिती तंत्रज्ञान शिक्षकांनी विभागीय समन्वयक सतीश धारराव यांच्याशी 9822525625 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपासनी यांनी केले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -