घरCORONA UPDATECoronavirus Lockdown: '३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार'

Coronavirus Lockdown: ‘३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसिंगनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह आले आहेत. “आज व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये मला सर्वात आधी बोलण्याची संधी दिली गेली. यावेळी महाराष्ट्रात तरी १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन कायम ठेवण्यासंबंधी मी भूमिका मांडली आहे. १४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यं हा लॉकडाऊन काम राहणार आहे. मात्र या काळात कामगारांचे काय होणार? परिक्षांचे काय होणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यावर १४ एप्रिल रोजी मी बोलेल”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “किमान ३० एप्रिल पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहिल. ३० तारखेपर्यंत आपण बंधने पाळली. घराबाहेर पडलो नाहीत. तर आपण ३० तारखेला यशस्वी होऊ शकतो. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो.” असे आवाहन ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पंतप्रधानांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत केले. ते म्हणाले की राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे ३३ हजार चाचण्या घेण्यात आल्या असून १५७४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर ३० हजार ४७७ जणांचे निगेटिव्ह आहेत. १८८ रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.

बाधित क्षेत्रांसाठी आम्ही तत्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरण याची परिणामकारक अंमलबजावणी करीत असल्याने संख्या वाढत असली तरी फैलाव रोखण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मृत्यू दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असला तरी जास्तीतजास्त मृत्यू अति धोका गटातील ज्येष्ठ आणि ज्यांना इतरही काही आजार आहेत यांचे झाले आहेत.

- Advertisement -

राज्यातील तपासणीसाठी आलेल्या ७० टक्के लोकांत लक्षणे दिसत नाहीत. यातील रोज १५० लोकांना आम्ही प्राथमिक उपचार करून बरे करून पाठवत आहोत. राज्यात कोविड उपचारांसाठी तीन स्तरावर व्यवस्था केली असून अगदी सर्दी, ताप, न्यूमोनिया लक्षणांसाठी कोविड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाच्या लक्षणांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि गंभीर रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड रुग्णालयातून उपचार करीत नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली

राज्यात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी संख्या वाढत असली तरी इतरत्र परिस्थिती नियंत्रणात हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्याचे उदाहरण दिले. परराज्यातील सुमारे ६ लाख श्रमिक, कामगार, स्थलांतरित यांना निवारा केंद्रातून दोन वेळेसचे जेवण, नाश्ता देण्यात येत आहे. पुल टेस्टिंग किंवा ग्रुप टेस्टिंग बाबत केंद्राने विचार करावा त्याचप्रमाणे सारी रोगाच्या प्रादुर्भावकडेही आमचे लक्ष आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणे लवकरात लवकर मिळावेत, अशी मागणी केली


 

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 11, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -