घरताज्या घडामोडीपालिकेकडे कोरोनाच्या ५ लाख लसींची मात्रा; पण, लाभार्थी केवळ १ लाखच

पालिकेकडे कोरोनाच्या ५ लाख लसींची मात्रा; पण, लाभार्थी केवळ १ लाखच

Subscribe

जवळजवळ एका महिन्यात १ लाख ७ हजार ७२५ लाभार्थ्यांनाच लस देण्यात आली आहे. म्हणजेच जेमतेम २०% लोकांनीच लस घेतली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने १६ जानेवारीपासून लसीकरण सेवा सुरू केली आहे. पालिकेकडे १३ फेब्रुवारीपर्यंत एकूण ५ लाख ३२ हजार १०० लसींची मात्रा उपलब्ध झाली आहे. मात्र, जवळजवळ एका महिन्यात १ लाख ७ हजार ७२५ लाभार्थ्यांनाच लस देण्यात आली आहे. म्हणजेच जेमतेम २०% लोकांनीच लस घेतली आहे. मात्र, पालिकेने तरीही लसीकरण प्रगतीपथावर असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पालिकेचा दावा आणि प्रत्यक्ष आकडेवारी पाहता त्यात तफावत असल्याचे समोर येत आहे. मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, आयुक्त इकबाल चहल यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर युद्धपातळीवर विविध उपाययोजना केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. या महामारीमुळे वर्षभरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधक लस भारतात उपलब्ध होऊन शासनाने त्याचे पद्धशीररित्या लसीकरण सुरु केले. मुंबई महापालिकेने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २३ लसीकरण केंद्रांमध्ये १२५ बूथ कार्यान्वीत केलेली आहेत.आवश्यकतेनुसार त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्यात येणार आहे.

लसीकरणाची वैशिष्टये

१३ जानेवारी २०२१ रोजी लस महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाली. आतापर्यंत ५,३२,१०० एवढ्या लसीकरण मात्रा प्राप्त झालेल्या आहेत. १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाचा शुभारंभ होऊन पहिला टप्पा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ९ अद्ययावत लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. १६ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या दिवशी १,९५७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा कोविड आघाडीवर काम करण्याऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला. लाभार्थ्यांच्या संख्या आणि सुलभतेसाठी १४ अतिरिक्त लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आणि सदर केंद्राची क्षमता दरदिवशी १२,५०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याइतपत वाढवण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलीस दलासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आणि टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. लसीकरण सुरु झाल्या पासून १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबईत १ लाख ७ हजार ७२५ पेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. यात ८७,४१६ आरोग्य कर्मचारी आणि २०,३०९ आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांमध्ये एकाही लाभार्थ्यास लसीकरणानंतर कोणतेही गंभीर विपरीत परिणाम झालेले आढळून आले नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisement -

लसीकरण करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण 

  • वैद्यकीय अधिकारी : ११,६७९
  • परिचारीका व पर्यवेक्षक : ५,६१४
  • इतर वैद्यकीय कर्मचारी: ५,३१६
  • शास्त्रज्ञ : १९२
  • वैद्यकीय विद्यार्थी : १,२६१
  • क्षेत्रिय वैद्यकीय कर्मचारी : १,८९६
  • प्रशासकीय कर्मचारी : ३,३५५
  • इतर आरोग्य कर्मचारी : ९,२७०
  • इतर : ३८,५८३

कोविन डॅशबोर्डनुसार लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध माहितीनुसार ५२ टक्के स्त्री आरोग्य कर्मचारी आणि ४८ टक्के पुरूष आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.


हेही वाचा – ‘लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे’ – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -