घरमुंबईCorona : तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते पण..., आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

Corona : तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते पण…, आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

Subscribe

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संशय व्यक्त केला. मागच्या महिन्या कोरोना केसेस १५० च्या आसपास होत्या ते आता अडीच हजारापर्यंत पोहोचल्या आहेत. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. शाळा, कॉलेज बंद करण्याबाबत अजून काहीही निर्णय घेतलेला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. पण गरज पडली तर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, असं देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

१५ ते १८ वर्षासाठी तीन तारखेपासून लसीकरण

१५ ते १८ वर्षासाठी जे लसीकरण सुरु करण्यात आलं आहे, त्याचा आढावा घेतला. याच आठवड्यात मुंबईतील शाळांबरोबर, कॉलेजसबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्या शाळा कॉलेजसमध्ये कशा पद्धतीने लसीकरण सुरु करु शकतो यावर उपायोजना करणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तीन तारखेपासून लसीकरण सुरु करण्याचा मानस आहे. बुस्टरसाठी ज्यांनी दुसरा डोस घेतल्याच्या ९ महिन्यानंतर बुस्टर घेणं गरजेचं आहे. किती लोकं येतात, किती फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थ वर्कर्स आहेत, ६० वर्षाच्या वर किती लोकं आहेत, याची यादी आम्ही काढत आहोत. जरी केसेस वाढत असल्या तरी एकदम पॅनिक होण्याची गरज नाही. ज्या इमारतीमध्ये जास्त रुग्ण सापडतील त्या सील केल्या जातील. मुंबईत ५४ हजार बेड्स उपलब्ध आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

तर कारवाई करणार

हॉटेल, रेस्टॉरंट्स किंवा कोणीही निर्बंध मोडले तर कारवाई करणार. ३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू असतील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -