घरमुंबईCoronaVirus: वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

CoronaVirus: वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

Subscribe

वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात चिंतेचं वातावरण

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने वरळी भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या मोरेश्वर कोळी यांची पत्नी आणि मुलाला देखील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

पोलीस कॅम्पमध्येही कोरोनाची एण्ट्री

वरळी कोळीवाडा, आदर्श नगरनंतर आता वरळी पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारत सील केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी कस्तुरबा रुग्णालयात असून मुलाला सेव्हन हिल्स तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

वरळी कोळीवाड्यात कर्फ्यूसह परिसर सील

कोरोनाचे रूग्ण वरळी कोळीवाड्यात आढळल्यानंतर गेल्याकाही दिवसापूर्वी त्याभागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात आला असून परिसरात महापालिकेकडून निर्जंतुकीकरणाचे काम सुरु आहे. कोळीवाड्यातील 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे.


CoronaEffect: कोरोना रुग्ण सापडल्याने वरळी कोळीवाडा सील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -