घरट्रेंडिंगकोरोनाचा फटका मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पालाही

कोरोनाचा फटका मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पालाही

Subscribe

चीनच्या तज्ञ अडकले विझाच्या प्रक्रियेत

मुंबई शहरातील महत्वकांशी अशा कोस्टल रोड प्रकल्पालाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. या प्रकल्पातील टनेलच्या कामासाठी आवश्यक चीन देशातील मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही आता व्हिजाच्या प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळेच हा प्रकल्प कोरोना व्हायरसमुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

व्हायरसमुळे व्हिझा रखडला

संपुर्ण कोस्टल रोडच्या प्रकल्पामध्ये ९.८ किलोमीटरचे टनेलिंग करण्यात येणार आहे. मुंबईच्या पश्चिमेला असलेल्या समुद्र किनारी गिरगाव चौपाटी ते मलबार हिलदरम्यान हे टनेलिंग होणार आहे. त्यासाठी आवश्यक टनेल बोरिंग मशीन हे शांघाय येथून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यासोबतच चीनमधील २५ तज्ञ हे टीबीएम मशीन असेंब्लीसाठी येणे अपेक्षित आहे. पण कोरोना व्हायरसमुळे त्यांना आता व्हिसा प्रक्रिया पार करून मुंबई गाठणे अवघड झाले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार या प्रकल्पाअंतर्गत आवश्यक असलेल्या टीबीएम मशीनसाठी असेंब्ली करण्याचे आणि टीबीएम मशीन हॅण्डओव्हर करण्याच्या कामासाठी एकुण दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आता महापालिकाही परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येईल यासाठीच्या प्रयत्नात आहे. एकुण १३ हजार १४१ कोटी रूपयांचा कोस्टल रोडसाठी खर्च येणार आहे.

भारतात टीबीएम मशीन आयात करण्यासाठी सध्या कोणतीही अडचण नाही. पण चीनमध्ये लॉजिस्टिक सेवा रखडली तर टीबीएम उशिरा दाखल होऊ शकते. पण टीबीएमशी संबंधित तांत्रिक कामगार, तज्ञ यांना सध्या विझा मिळत नाही ही मोठी अडचण आहे. टीबीएम हे वुहानपासून १६०० किमी अंतरावरून येणार आहे. सद्यस्थितीला महापालिका अनेक पद्धतीने या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

कोस्टल रोडची डेडलाईन हुकणार

याआधीच २०२३ पर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. आता टीबीएम उशिरा दाखल होणार असल्याने या प्रकल्पासमोरील अडचणी वाढणार आहेत. टीबीएमच्या माध्यमातून १२.१९ मीटर रूंदीचा टनेल खोदण्यात येईल. तर ३.४ किलोमीटर लांबीचे दोन समांतर टनेल खोदण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -