घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस आज नागपूर कोर्टासमोर हजर राहणार

देवेंद्र फडणवीस आज नागपूर कोर्टासमोर हजर राहणार

Subscribe

आज नागपूर न्यायालयात फडणवीसांच्या निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटले लपवल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर आहे.

आज नागपूर कोर्टात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या निवडणूक शपथपत्र प्रकरणावर सुनावणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाले असून आज नागपूर कोर्टात सुनावणीसाठी हजर राहणार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटले लपवल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, फडणवीस हजर न राहता त्यांचे वकील कोर्टात हजर होते. परंतु आजच्या सुनावणीला स्वत: फडणवीस कोर्टात उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. मात्र, फडणवीसांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी फडणवीसांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात केला होता. दरम्यान, मुंबई उच्च याआधी क्लीन चिट दिल्याने अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे क्लीन चिट देणारे आदेश बाजूला ठेवत फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय आहे?

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस निवडणूक शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटले लपवल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांनी केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी जेएमएफसी न्यायालयात केली होती. अॅड. सतीश उके यांची याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती.


हे ही वाचा – वायकर, सावंत यांचा मंत्रिपदाचा राजीनामा?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -