घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईत आज १ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद; ४१ मृत्यू

Coronavirus Mumbai: मुंबईत आज १ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद; ४१ मृत्यू

Subscribe

मुंबईत लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोनाचे रुग्ण अजूनच वाढत आहेत. मुंबईत आज दिवसभरात १ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ६६ हजार ५०७ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ६२४ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ हजार ४९१ इतकी झाली आहे. तर २९ हजार ३४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

मृतांमध्ये ३७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २६ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर ११ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८६७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार ७ वर पोहचली आहे. तसेच ६२४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३३ हजार ४९१ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -