घरCORONA UPDATE'लॉकडाऊन'मुळे २१ दिवसांचा पास वाया; लोकल पासला मिळणार मुदतवाढ?

‘लॉकडाऊन’मुळे २१ दिवसांचा पास वाया; लोकल पासला मिळणार मुदतवाढ?

Subscribe

सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेता,पासची होणार मुदतवाढ?

देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना कोरोना हा व्हायरस दिवसेंदिवस अनेकांचे बळी घेत आहे. यामुळे सर्वच स्तरात भितीचे वातावरण असून त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारसह प्रशासनाने घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन देशात असणार अशी घोषणा केल्यानंतर सर्वच खासगी कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या २१ दिवस लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांचा उपनगरीय लोकल सेवेचा पास वाया गेल्याने काही मुंबईकर चिंतेत आहे. या चिंतेत असणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने दिलासा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सोशलमीडियावर पास वाया गेल्याची चिंता मुंबईकरांकडून व्यक्त

लॉकडाऊन दरम्यान मुंबई लोकलसेवा पुर्णतः बंद करण्यात आली आहे. या दिवसांची भरपाई म्हणून मासिक पासला काही दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येण्याची दाट शक्यता असल्याने लॉकडाऊननंतर काही दिवस त्याच पासवर मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. २१ दिवस सार्वजनिक वाहतूकीसह मुंबई लोकल बंद आहे. या काळात लोकलचा पास वाया गेल्याची चिंता अनेक मुंबईकर सोशलमीडियावर व्यक्त करत आहे. लॉकडाऊनचे २१ दिवस भरपाई म्हणून काही दिवस पास वाढवून देण्याबाबत अद्याप रेल्वे मंडळाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. मात्र विशेष प्रकरण म्हणून पासची मुदतवाढ देता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा- रोजंदारी मजूरांना केडीएमसीचा मदतीचा हात

सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेता,पासची होणार मुदतवाढ?

लॉकडाऊनच्या काळातील लोकल पासची मुदतवाढ करण्यासोबत रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्स्प्रेस तिकिटांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अॅपद्वारे पास काढल्यास ‘कॅशबॅक’ची सोय असून उपनगरीय रेल्वेच्या तिकिटांसह मासिक पासवर रेल्वेकडून सबसिडी देण्यात येते. उपनगरीय रेल्वेच्या पासचे पैसे परत करण्याबाबत रेल्वेमध्ये कोणतेही धोरण नसताना ही सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेता, काही दिवस पासची मुदत वाढवून देण्यात येईल, असे रेल्वे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -