घरमुंबईCorono: ठाणे शहरात २ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन

Corono: ठाणे शहरात २ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन

Subscribe

ठाणे मनपा आणि पोलिसांनी २ जुलैपासून पुढील १० दिवसांपर्यंत संपूर्ण ठाणे शहरात कडकडीत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय

ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याने ठाणे मनपा आणि पोलिसांनी २ जुलैपासून पुढील १० दिवसांपर्यंत संपूर्ण ठाणे शहरात कडकडीत लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात केवळ दुधाचा पुरवठा, केमिस्टचे दुकान, आरोग्य सेवा कार्यरत असणार आहे. इतर दुकानं बंदच राहणार आहे. ठाण्यात कोरोनाचे आतापर्यंत ८ हजार १६८ रुग्ण आढळले आहेत तर २७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यात कुठे होणार लॉकडाऊन?

बाळकुंभ, कोळशेत, ढोकाई, राम मारुती नगर, मानपाडा, घोडबंदरचा काही भाग, नौपाड्यातील काही हॉटस्पॉट, वागळे इस्टेट, किसन नगर, शांतीनगर, पडवळ नगर, वारली पाडा, कैलास नगर, राम नगर, सिपी तलाव, इंदिरा नगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा येथे लॉकडाऊन असणार आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन एक महिन्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता ३१ जुलैपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. दरम्यान ३१ जुलैपर्यंत वाढलेला लॉकडाऊनही पूर्वीच्या तुलनेत थोडासा दिलासा मिळाला असून सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी

ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात निवेदन देणारा व्हिडिओ जारी केला असून त्यात ही सर्व माहिती त्यांनी दिली आहे. ‘लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने बाहेर आले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे लॉककडाऊन जाहीर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत’, असं ते म्हणाले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या ज्या भागात लॉकडाऊन जाहीर होणार आहे, त्या भागांची यादी देखील दिली आहे. ‘नागरिकांना विनंती आहे की जीवनावश्यक बाबींची खरेदी करून ठेवावी. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. यासंदर्भात पालिका आयुक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील’, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हे राहणार बंद

लॉकडाऊनच्या कालावधीत ठाणे पालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्ते बंद राहणार आहेत. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. मॉर्निग वॉक आणि इव्हनींग वॉक हे देखील बंद असणार आहेत. अंतर्गत रिक्षा, टॅक्सी वाहतूकही बंद राहणार आहे.

हे राहणार सुरू

१० दिवसांच्या बंद काळात केवळ दुध विक्रीची दुकाने, मेडीकल आणि डॉक्टरांचे दवाखाने सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा:यांनाच या कालावधीत ये जा करण्याची मुबा असणार आहे. हायवे सुरु राहणार असले तरी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजवणी केली जाणार आहे.


राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -