घरमुंबईपालिका मेडिकल कॉलेजमध्ये पॅरामेडिकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी

पालिका मेडिकल कॉलेजमध्ये पॅरामेडिकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या रुग्णालये, मेडिकल कॉलेजमध्ये पॅरामेडिकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.
या ठरावाला बहुमताने मंजुरी मिळाली व त्यावर आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यास त्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. तसेच, पालिका रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अभ्यासक्रमातील शिकाऊ प्रशिक्षणार्थीची चांगली मदत होईल. त्याचप्रमाणे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

वैद्यकशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या क्षेत्रात कारकीर्द घडवायची असल्यास डॉक्टरच झाले पाहीजे असे नाही. तर उप वैद्यकीय क्षेत्रातही (पॅरामेडिकल क्षेत्र) अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच उप वैद्यकीय क्षेत्राचेही अनन्यसाधारण महत्व आहे. कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश न मिळवता आलेल्या विद्यार्थ्यांना उप वैद्यकीय क्षेत्र हा आश्वासक पर्याय आहे, असे नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी म्हटले आहे. तसेच, प्रयोगशाळा, रेडीओग्राफी, रेडिओथेरपी, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी ह्यांसारख्या विविध विषयांतील अभ्यासक्रम ‘ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी’ मध्ये उपलब्ध आहेत.

- Advertisement -

आजारी व्यक्तींची ओळख ओळखून दैनंदिन आयुष्यात स्वतंत्रपणे काम करता येते. ह्यासाठी अशा क्षेत्रातील तंत्रज्ञ त्यांना मदत करतात. रुग्णालये तसेच पॅथॉलॉजीकल प्रयोगशाळा , एम.आर. आय., सीटी स्कॅन ह्यांसारख्या ठिकाणी रोगनिदान करण्यासाठी, वैद्यकीय उपकरणे हाताळण्यासाठी सदर क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तींची आवश्यकता असते. मुंबई महापालिका रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवत असली तरी पालिका मेडिकल कॉलेजमध्ये ‘उप वैद्यकीय प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविण्यात येत नाही.

त्यामुळे पालिका रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत प्रशिक्षित तंत्रज्ञांची संख्या अगदीच नगण्य आहे त्यामुळे उपलब्ध तंत्रज्ञानवर रुग्णसेवेचा बोजा अधिक प्रमाणात पडतो. तसेच, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचीही मोठी गैरसोय होत असते. ही वस्तुस्थिती पाहता, पालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये, पॅरामेडिकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -