घरCORONA UPDATECoronavirus: धारावी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने होतेय वाढ

Coronavirus: धारावी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने होतेय वाढ

Subscribe

धारावीत मागील चार दिवसांपासून रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली असून सरासरी २५ रुग्ण आढळून येत आहे. विशेष म्हणजे धारावीतील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मागील तीन दिवसांमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत दहा दिवसांमध्ये येथील रुग्णांची संख्या ४२ च्या वर पोहोचली आहे.

धारावीमध्ये रविवारी २६ नवीन रुग्ण आढळून आले असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुकंद नगर तसेच ट्रान्झिट कॅम्प येथे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५९ वर पोहोचली आहे. तर यामध्ये २९ जणांच्या मृत्यूचा सामावेश आहे. रविवारी येथील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पहिला रुग्ण २९ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर ३ मे रोजी याठिकाणी ११ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ०७ रुग्ण आढळून होते. तर आता शुक्रवार पासून रविवारपर्यंत १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे माटुंगा लेबर कॅम्पमधील बाधित रुग्णांची संख्या ४० च्या पुढे गेलेली आहे.

- Advertisement -

माहिम,दादरमध्ये एका दिवसांत ११ रुग्ण

दादरव माहिममध्ये दिवसभरात एकूण ११ रुग्ण आढळून आले आहे. दादरमध्ये ०४ तर माहिममध्ये ०७ रुग्ण आढळले. दादरमध्ये कोहिनूर टॉवर, भवानी सोसायटी, स्वाती मनोज सोसायटीत तर माहिममध्ये मच्छिमार नगर, मोरी रोड, माहिम कोळीवाडी, कर्नाटक सोसायटी, सिटीलाईट सिनेमा आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहे. माहिममध्ये मकदुमिया नगर व कॅडल रोड येथल नुरानी बिल्डींग आदी ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दादरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूणण्संख्या १०९ वर पोहोचली असून त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहिममध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११९ एवढी झाली असून त्यामध्ये ७जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -