घरमुंबईभगवती रुग्णालयातील आयसीयू कक्षावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद

भगवती रुग्णालयातील आयसीयू कक्षावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद

Subscribe

भगवती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ६९ खाटांची सुविधा सुरु झाल्यानंतर अतिदक्षता व व्हेंटीलेटर कक्षाचे लोकार्पण महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या हस्ते पार पडले. महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी याचे लोकार्पण करत याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताच आमदार मनिषा चौधरी यांनीही आयसीयूची सुविधा आपल्याच प्रयत्नाने सुरु  झाल्याचा दावा करत शिवसेनेला काही न करता करून दाखवता येते असा टोला लगावला.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने दहिसर, बोरीवली भागांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. मात्र, येथील भगवती रुग्णालयात मार्चपासूनच ६९ खाटांची सुविधा कोविड रुग्णांसाठी करण्यात आली होत. परंतु या ठिकाणी आयसीयू तसेच व्हेंटीलेटर्सची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे चिंताजनक असलेल्या रुग्णांना ट्रामा केअर रुग्णालय, सेव्हन हिल्य किंवा कुपर रुग्णालयात हलवले जात किंवा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले जात होते. त्यामुळे या रुग्णालयात आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून वारंवार केली जात होती.

- Advertisement -

त्यानुसार महापालिका प्रशासनाने याठिकाणी आयसीयू बेड व व्हेंडीलेटर कक्ष तयार करून याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचे लोकार्पण सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मात्र, भगवती रुग्णालयातील आयसीयू कक्षाचे लोकार्पण झाल्याची बातमी कळताच भाजप आमदार मनिषा चौधरी भगवती रुग्णालयात आयसीयू बेड्स सुरु करण्याची मागणी आपण सर्वांत प्रथम महापालिका आयुक्तांकडे केली होती, असा दावा केला. यासाठी आपला पाठपुरावा सुरु होता. तसेच दोन दिवसांपूर्वी आपली रुग्णालयात याची आढावा बैठकही पार पडली असल्याचे सांगितले. परंतु महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुपचुप जावून याचे लोकार्पण केले. याला महापालिकेचे अधिकारीही उपस्थित नव्हते. त्यांना केवळ करून दाखवला हा शब्दच येतो. पण काही करून दाखवता येत नाही, अशा शब्दात टिका करत फिती कापून कामे करता येत नाही. जर त्यांना काही करूनच दाखवायचे असेल तर मुंबई-महाराष्ट्रातून कोरोना मुक्त करून दाखवावा. उगाच न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. आज विभागातील लोकांसाठी वैद्यकीय शिबिर व खिचडीचे वाटप कोण करते हे जनतेला माहित आहे. पण ही बाळासाहेबांची शिवसेना नाही हे मात्र नक्की, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

१० महिन्यांच्या बाळासह मनमाडचे ९ रुग्ण कोरोनामुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -