घरमहाराष्ट्रनाशिक१० महिन्यांच्या बाळासह मनमाडचे ९ रुग्ण कोरोनामुक्त

१० महिन्यांच्या बाळासह मनमाडचे ९ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड यांनी दिले पुष्पगुच्छ

मनमाड शहरातील ९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यात १० महिन्यांच्या बाळासह ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांनी या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मनमाडला रुग्णांची संख्या ५१ होती, त्या पैकी ४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर उर्वरित ५ रुग्णांवर उपचार सुरू असून लवकरच त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
मनमाडसह मालेगाव, येवला, लासलगाव, चांदवड या चारही शहरांत कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र मनमाड शहर कोरोनामुक्त होते. परंतु २ मे रोजी शहरात करोनाची एन्ट्री झाली त्यानंतर रुग्ण वाढतच गेले. बाधितांची संख्या ५१ झाली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून पालिका प्रशासन, पोलीस, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी, आरोग्य विभाग या सर्वांनी योग्य त्या उपाययोजनांद्वारे परिस्थिती नियंत्रणात आणली. आजघडीस ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांनी या रुग्णांना पुष्पगुच्छ देवून त्यांना निरोप दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी दावल साळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ससाणे, तहसीलदार कुलकर्णी, नायब तहसीलदार योगेश जमधाडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नांदगावच्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के, बीडीओ गणेश चौधरी, नोडल ऑफिसर डॉ. रवींद्र मोरे, किरण पाटील, पालिकेचे अजहर शेख उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -