घरताज्या घडामोडीमगरीच्या सुटकेसाठी 'रॉ' आली मदतीला, ४० दिवस चालले रेस्क्यू ऑपरेशन

मगरीच्या सुटकेसाठी ‘रॉ’ आली मदतीला, ४० दिवस चालले रेस्क्यू ऑपरेशन

Subscribe

मुलुंड पश्चिमेला असलेल्या स्वप्ननगरी परिसराजवळ एक अर्धवट बांधकाम झालेला परिसर आहे. येथील परिसरात इमारतीच्या पायासाठी खोदकाम करण्यात आले होते. 'या परिसरात फारसे काही खाद्य नसताना देखील, वातावरण सुरक्षित असल्याने मगर येथेच राहीली असावी', असे डब्ल्यू डब्ल्यू ए या संस्थेचे आदित्य पाटील यांनी सागितले आहे.

तब्बल दोन महिन्यांपासून सतत पाठपुरावा करून आणि अनेक प्रयत्नांमधून एका मगरीला वाचवण्यात यश आले आहे. मुलुंड पश्चिम येथील एका बांधकामाच्या परिसरात आढळलेल्या मगरीची रविवारी सकाळी सुटका करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून या मगरीच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात होते. सहा फूट लांब मगरीची सुटका झाल्यानंतर अखेर येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यामुळे चाळीस दिवसांच्या प्रयत्नानंतर रविवारी डब्ल्यू डब्ल्यू ए आणि रॉ या संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मगरीची सुटका करण्यात यश मिळाल आहे.

मुलुंड पश्चिमेला असलेल्या स्वप्ननगरी परिसराजवळ एक अर्धवट बांधकाम झालेला परिसर आहे. येथील परिसरात इमारतीच्या पायासाठी खोदकाम करण्यात आले होते. ‘या परिसरात फारसे काही खाद्य नसताना देखील, वातावरण सुरक्षित असल्याने मगर येथेच राहीली असावी’, असे डब्ल्यू डब्ल्यू ए या संस्थेचे आदित्य पाटील यांनी सागितले आहे. तसेच ‘मगरीची तपासणी करून तिला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले’ अशी माहिती रॉ संस्थेकडून पवन शर्मा यांनी दिली.

- Advertisement -

मगर आढळलेल्या परिसराच्या एका बाजूस निवासी इमारती आहेत तर दुसऱ्या बाजूस झोपडपट्टी आहे. या परिसरात मगर आढळल्याचे नागरिकांनी वनविभागाला नोव्हेंबरमध्येच कळविले होते. अनेक दिवसांपासून मगर पकडण्यासाठी प्रयत्न चालू होते १० फूट लांबीचा पिंजरा तयार करून मगरीला पकडण्यात यश आले आहे. तसेच मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात कॅमेरे देखील बसवण्यात आले होते. हा पिंजरा २० फेब्रुवारीला बसवण्यात आला होता, त्यानंतर रविवारी (२४ फेब्रुवारी) सकाळी मगर पिंजऱ्यात अडकल्याचे अधिकऱ्यांनी सुचीत केले. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश आलं असून परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -