घरCORONA UPDATEलोकल सुरू होताच प्रवाशांची स्थानकाबाहेर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

लोकल सुरू होताच प्रवाशांची स्थानकाबाहेर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी उपनगरीय लोकल सेवा सोमवारपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र सोमावरी प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे लोकलमध्ये गर्दी कमी होती. मात्र मंगळवारी प्रवाशांना लोकल सेवा सुरु झाल्याची माहिती मिळताच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाण रेल्वे स्थानकासमोर गर्दी केली. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकात मंगळावरी गर्दी उसळली. तसेच लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकात पूर्णतः फिजिकल डिस्टनसिंगचे तीनतेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रवाशांनी या संकटकाळात रेल्वेला सहकार्य करत गर्दी करू नये. रेल्वेत फिजिकल डिस्टनसिंगचे पालन व्हावे यासाठी लोकलमध्ये फक्त ७०० प्रवासी बसण्याचे नियोजन केले आहे. तसेच सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी मध्य रेल्वेकडून घेण्यात येत आहे. फिजिकल डिस्टनसिंगचे पालन होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisement -

अबब! लोकल सुरू होताच स्थानकाबाहेर प्रवाशांची रांग

मुंबईची लाईफलाईन रेल्वे सुरू होताच विरार स्थानकावर लोकांनी तिकीट खिडकीसमोर पास घेण्याकरता गर्दी केली

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 16, 2020

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी दररोज ३६० लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आणि लोकल फेऱ्या कमी अशी परिस्थिती मंगळावारी दिसून आली. सोमावरी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल सेवा सुरु झाली याची कल्पना नव्हती. मात्र त्याची माहिती मिळताच मंगळवारी सकाळपासून रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. परिणामी लोकल डब्यात सुद्धा प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे अनेक कर्मचारी एका सीटवर तीन प्रवासी बसल्याचे चित्र दिसून आले. तर काही कर्मचारी उभ्याने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. तशीच परिस्थिती महिला डब्यातसुद्धा दिसून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले. रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांनी फिजिकल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात रिंगण केले होते. या एका रिंगात एक प्रवासी उभा होता. मात्र रेल्वे स्थानकावर गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी स्थानकाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रेल्वे स्थानकाबाहेर लांब रांगा लागल्यामुळे पावसातही प्रवासी भिजले असल्याचे दिसून आले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या नावाने शंख केले.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईवरचा ‘लोड’ कमी होणार?; योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -