घरताज्या घडामोडीरुळावरील स्विफ्ट कारला रेल्वेची जोरदार धडक

रुळावरील स्विफ्ट कारला रेल्वेची जोरदार धडक

Subscribe

रात्री उशिरा रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी व विविध विभागाच्या तंत्रज्ञांनी याठिकाणी भेट देऊन केली पाहणी

नाशिकरोड येथून जवळच असलेल्या सौभाग्यनगर भागातील शनिमंदिरापासन रेल्वे ट्रॅककडे जाणा-या मार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार सरळ रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबली. भेदरलेल्या चालकाने गाडीतून उतरुन पळ काढल्याचे समजते. याचवेळी मुंबईकडून भुसावळकडे जात असलेली भुसावळ आरओएच हि गाडी वेगाने आली व ट्रॅकवर असलेल्या स्विफ्ट (एमएच ३१ सीपी ५६५५) हिला जोरदार धडक दिली.

धडक दिल्याने स्विफ्ट गाडी ट्रॅकच्या डाव्या बाजूला फेकली गेली असून तिचा चक्काचूर झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंग गुहलोत, राजपूत व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचे अभियंते अनिल कुमार, निराला यांनी पहाणी केली. रेल्वे सुरक्षा बलाने या घटनेचा पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. चारचाकी उडवल्याची माहिती देवळाली रेल्वेस्थानकाशी संपर्क साधून मिळाली. रात्री उशिरा रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी व विविध विभागाच्या तंत्रज्ञांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -