घरताज्या घडामोडीदहिसर आणि अंधेरीत मालमत्ताकरापोटी सव्वा कोटींचा महसूल जमा

दहिसर आणि अंधेरीत मालमत्ताकरापोटी सव्वा कोटींचा महसूल जमा

Subscribe

दहिसर आणि अंधेरीत मालमत्ताकरापोटी सव्वा कोटींचा महसूल जमा करण्यात आला आहे.

परिसरातील मालमत्ता कर न भरणार्‍यांविरोधात यंदा प्रथमच अधिक कठोर पावले उचलणार्‍या महापालिकेने थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज आदी वस्तू जप्त करण्यास गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आज ’आर उत्तर’ विभाग कार्यक्षेत्रात असणाऱ्या दहिसर परिसरातील ’मे. एनआरओ एन रोज’ या कंपनीकडे असलेल्या रुपये १ कोटी ६ लाख रुपये तर अंधेरी पश्चिम परिसरात असणाऱ्या ’मे. लष्करीया प्रॉपर्टीज’ यांच्या उच्च श्रेणीतील दोन वाहनांना ’जामर’ बसवून ती स्थानबद्ध करण्यात आली. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण रुपये १ कोटी २८ लाखांचा भरणा महापालिकेकडे केल्यानंतर त्या कंपन्यांनी मालमत्ता कराची उर्वरित रक्कम भरण्याची हमी दिल्यानंतर ही वाहने करनिर्धारण आणि संकल्प विभागाने सोडून दिली.

वाहने जप्त करताच भरली कराची रक्कम

दहिसर परिसरात असणाऱ्या ’मे. एनआरओ एन रोज’ या संस्थेकडे तब्बल १ कोटी ६ लाख रुपयांची थकबाकी मालमत्ता करापोटी होती. महापालिकेच्या नियमांनुसार वेळोवेळी नोटीस बजावून आणि वारंवार सूचना देऊन देखील सदर कंपनीद्वारे मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जात होती. या अनुषंगाने मालमत्ता कर भरण्यास केली जात असलेली टाळाटाळ बघून आज अखेरचा उपाय म्हणून या कंपनीची चल संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सर्वप्रथम या कंपनीच्या मालकीची उच्च श्रेणीतील कार आज सकाळी जप्त करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने महापालिकेच्या ’आर उत्तर’ विभाग कार्यालयात धाव घेत रुपये ७८ लाख रुपयांचा पहिल्या हप्त्याचा धनादेश महापालिकेच्या करनिर्धारक आणि संकलन खात्यातील कर्मचार्‍यांकडे सुपुर्द केला. हा धनादेश प्राप्त झाल्यानंतर आणि उर्वरित रक्कम लवकरात लवकर भरण्याची हमी देण्यात आल्यानंतर जप्त केलेली कार सोडण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम परिसरातील ’मे. लष्करीया प्रॉपर्टीज’ यांच्यावर असणाऱ्या मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या उच्च श्रेणीतील दोन वाहनांना जामर बसवून स्थानबद्ध करण्यात आले. सदर कंपनीच्या प्रतिनीधीने देखील महापालिकेच्या विभाग कार्यालयात संपर्क साधत रुपये ५० लाखांचा मालमत्ता कराचा भरणा केला. त्यानंतर वाहनांचे जामर काढण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाचा धसका, सार्वजनिक कार्यक्रमांना ‘नो’ परमिशन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -