घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका क्षेत्रात हरित जागांची माहिती देणारा 'डॅशबोर्ड' लवकरच

मुंबई महापालिका क्षेत्रात हरित जागांची माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ लवकरच

Subscribe

मुंबई महापालिकेने शहरातील प्रदूषण कमी करून हरित मुंबई निर्माण करणे आणि जैवविविधता वाढविण्यासाठी जनजागृती, वृक्षारोपण यासारख्या विविध बाबींना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच, मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित जागांची माहिती देणारा 'डॅशबोर्ड' लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने शहरातील प्रदूषण कमी करून हरित मुंबई निर्माण करणे आणि जैवविविधता वाढविण्यासाठी जनजागृती, वृक्षारोपण यासारख्या विविध बाबींना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच, मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित जागांची माहिती देणारा ‘डॅशबोर्ड’ लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या इमारती आणि प्रस्तावित इमारतींच्या गच्चीवर हरित बाबींविषयी कार्य करण्यास मार्गदर्शन करून तांत्रिक माहिती देण्यात येणार आहे. (Dashboard to provide information about green spaces in Mumbai municipal area soon)

मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित-जागांची अधिकाधिक चांगली जपणूक व्हावी, वाढ व्हावी आणि मुंबईचे पर्यावरण सातत्याने समृद्ध व्हावे; या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने दोन दिवसीय विशेष कार्यशाळा १४ – १५ डिसेंबर रोजी भायखळा येथील राणीच्या बागेत पार पडली. या कार्यशाळेत देशभरातील विविध संस्था आणि ६० पेक्षा अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते.

- Advertisement -

या कार्यशाळेत पालिकेच्या पर्यावरण खाते, घन कचरा व्यवस्थापन खाते, उद्यान खाते आदी खात्यानी आपला सहभाग नोंदवला. त्याचबरोबर राज्य सरकारच्या अखत्यारितील कांदळवन कक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे प्रतिनिधी देखील या कार्यशाळेला उपस्थित होते.

मुंबईतील हरित क्षेत्रे वाढवण्यासाठीची धोरणे आणि भविष्यातील कृती आराखडा

- Advertisement -

या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही सर्व संबंधितांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने व त्यांचे विचार आणि अनुभव ऐकण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले. या कार्यशाळेमुळे भविष्यातील आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना करण्याबाबत मोलाची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मुंबईतील हरित क्षेत्रे वाढवण्यासाठीची धोरणे आणि भविष्यातील कृती आराखडा तयार करण्यात मदत होणार आहे, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यावेळी केले.

या कार्यशाळेच्या दरम्यान सेंटर फॉर अर्बन अँड रिजनल एक्सलन्स (क्युअर), स्त्री मुक्ती संघटना, चेन्नई रेझिलियन्स सेंटर यांच्यासह विविध सल्लागार यांनी देखील आपल्या अनुभव आधारित माहितीच्या आधारे विश्लेषणात्मक मांडणी केली. ही कार्यशाळा शहरांमधील वने, नैसर्गिक जागा आणि हरित पायाभूत बाबी यांची जपणूक, व्यवस्थापन, पुनर्स्थापन यासह उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘सिटीज फॉर फॉरेस्ट’ या जागतिक उपक्रमाचा भाग आहे.

महापालिकेच्या ‘एम/पूर्व’ विभागातील लल्लूभाई कंपाऊंड आणि चित्ता कॅम्प तर, ‘पी/उत्तर’ विभागातील आंबोजवाडी येथे कॅटरपिलर प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या प्रायोगिक प्रकल्पांबाबत देखील सविस्तर चर्चा या कार्यशाळेदरम्यान करण्यात आली. हा प्रकल्प राबविण्यात डब्ल्यूआरआय इंडिया, टाटा समाज विज्ञान संस्था आणि युवा संस्था यांचे देखील सहकार्य मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याला प्राप्त झाले.

या कार्यशाळेत चर्चिले गेलेले महत्वाचे मुद्दे :

  • हरित जागांसाठी उपलब्ध जागांची सुनिश्चितता करताना जैवविविधता, सार्वजनिकता, पोहोच यासारख्या विविध मानदंडाच्या आधारे विश्लेषण करणे.
  • अनौपचारिक वसाहतींच्या परिसरात सूक्ष्म हरित जागांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे.
  • स्थानिक लोकांच्या माहितीचा व ज्ञानाचा संस्थात्मक यंत्रणेत उपयोग करवून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • शहरातील जैवविविधता वाढविण्यासाठी जनजागृती, वृक्षारोपण यासारख्या विविध बाबींना प्रोत्साहन देणे.
  • कांदळवन जागांबाबत संबंधितांना वेळोवेळी अवगत करणे.
  • मुंबई जैवविविधता समितीमध्ये जैव विविधता तज्ज्ञांना अधिकाधिक सहभाग नोंदविण्यास प्रोत्साहीत करणे.
  • लोकसहभागिता पद्धतीने जनजागृती करण्यासह भूमिका व दायित्व यांचे निर्धारण करणे.

हेही वाचा – सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल करावा; दीपक केसरकरांचे आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -