घरताज्या घडामोडीलोअर परेल भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू

लोअर परेल भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

या भीषण अपघातामध्ये दोन पादचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मुंबईतील लोअर परेल मधील डिलाईरोड परिसरात भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास एका भरधाव डंपरनं रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात दोन्ही पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून अपघातनंतर डंपरचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि घटनास्थळावरील इतर कंटेनरच्या काचा संतप्त जमावाने फोडल्या.

रात्री साडे अकराच्या सुमारास एका भरधाव डंपरने दोन पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्याचा नायर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या डंपरच्या अपघातात एका ओमनी कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

- Advertisement -

स्थानिक प्रशासनाचा निषेध

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डिलाईरोड परिसरातील नागरिकांने स्थानिक प्रशासनाचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही या घटनास्थळापासून जवळ असल्यामुळे या अपघाताचा आवाज आला. हा आवाज ऐकू आल्यानंतर आम्ही पटकन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळेस एका नागरिकाचा आमच्या समोरच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मला स्थानिक प्रशासनाचा निषेध करावा वाटतो. येथील रोडवर कुठे तुम्हाला झेब्रा क्रोसिंग नाही.’


हेही वाचा – नंदुरबारमध्ये दोन दुकानांना भीषण आग!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -